Advertisement

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून अप आणि डाऊन मार्गावरील लोकल ३० ते ३५ मिनिट उशिरानं धावत आहेत.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
SHARES

कल्याण स्थानकावरील १०२ वर्ष जुना पत्री पुलाच्या पाडकामासाठी नुकताच घेण्यात आलेल्या जम्बोब्लॉकनंतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून अप आणि डाऊन मार्गावरील लोकल ३० ते ३५ मिनिट उशिरानं धावत आहेत.


तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत 

कांजूरमार्ग स्टेशनवर सीएसएमटी-कल्याण लोकलमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी कुर्ला-मुलुंड दरम्यान स्लो ट्रॅकवरची वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली आहे. मात्र मध्य रेल्वेकडून नेमका काय बिघाड झाला आहे? याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.


चाकरमान्यांचे हाल 

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऐन सकाळी वाहतूक विस्कळीत झाल्यानं स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. आठवड्याचा पहिला दिवस आणि त्यात रेल्वेच्या उशिरा धावत असल्यानं चाकरमान्यांचे हाल होतान दिसत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा