Advertisement

रविवारी मध्य रेल्वेवर 6 तासांचा मेगाब्लॉक


रविवारी मध्य रेल्वेवर 6 तासांचा मेगाब्लॉक
SHARES

मध्य रेल्वेच्या अंबरनाथ-बदलापूरदरम्यान पुलाच्या तांत्रिक दुरुस्तीकामासाठी रविवारी स्पेशल ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकदरम्यान रेल्वेच्या अंबरनाथ ते वांगणीच्या अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान कल्याण ते डोंबिवलीपर्यंतच्या अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक सकाळी 9.10 ते दुपारी 12.50 वाजेपर्यंत तर, अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक सकाळी 9.10 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. ठाकुर्ली स्थानकावरील अप आणि डाऊन दिशेची वाहतूक सकाळी 9 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. सीएसटी ते अंबरनाथ, सीएसटी ते कसारा, आसनगाव आणि टिटवाळ्याकरता डाऊन जलद मार्गावरील वाहतूक दुपारी 12, तर अप जलद मार्गावरील वाहतूक दुपारी 12.45 नंतर सुरू होणार आहे.


ब्लॉकदरम्यान प्रवाशांसाठी विशेष गाड्या

ब्लॉकदरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी-डोंबिवली-सीएसटी, सीएसटी-ठाणे-सीएसटी, कल्याण-कसारा, आसनगाव, टिटवाळा-कल्याण, कल्याण-अंबरनाथ-कल्याण स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे. तर, कर्जत-खोपोली ट्रेन वेळापत्रकानुसार धावणार आहेत.


रविवारी लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक बदलणार

रविवारी मुंबईत येणाऱ्या पुणे-सीएसटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, मनमाड-सीएसटी पंचवटी एक्सप्रेस, मनमाड-एलटीटी गोदावरी या एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. 12140 नागपूर-सीएसटी सेवाग्राम एक्स्प्रेस रविवारी नाशिक रोडपर्यंतच चालवण्यात येईल. तेथूनच नाशिकसाठी रवाना करण्यात येणार आहे. याशिवाय मुंबईत येणाऱ्या काही मेल-एक्स्प्रेस गाड्या कल्याण स्थानकात काही कालावधीसाठी थांबवण्यात येणार असल्यामुळे या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावणार आहेत. यामध्ये हावडा-मुंबई एक्स्प्रेस, राजेंद्रनगर-एलटीटी एक्स्प्रेस, गोरखपुर-सीएसटी एक्स्प्रेस, अहालाबाद-एलटीटी स्पेशल ट्रेन, वाराणसी-एलटीटी एक्सप्रेस, जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस, हटिया-एलटीटी एक्स्प्रेस, वाराणसी-सीएसटी महानगरी एक्स्प्रेस, अलाहाबाद-एलटीटी द्रुतगतीमार्गावर एक्स्प्रेस, पाटलीपुत्र-एलटीटी एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.


या गाड्यांच्या वेळेत बदल

डाऊन मार्गावरील या मेल-एक्स्प्रेस गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. यामध्ये सीएसटी-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, सीएसटी-नागरकोविल एक्स्प्रेस, एलटीटी-ककीनाडा पोर्ट, सीएसटी-हैदराबाद एक्स्प्रेसचा समावेश आहे. एलटीटी-गोरखपुर, सीएसटी-हावडा या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा