Advertisement

आंगणेवाडीच्या यात्रेसाठी कोकणात जाताय, मग या स्पेशल गाड्यांची सोय


आंगणेवाडीच्या यात्रेसाठी कोकणात जाताय, मग या स्पेशल गाड्यांची सोय
SHARES

मुंबईहून आंगणेवाडीच्या जत्रेला कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी ४ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एलटीटी आणि सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान या गाड्या चालवण्यात येणार असून २६ जानेवारीला त्या सोडण्यात येतील.


गाड्यांचं वेळापत्रक

०११६१ ही गाडी २६ जानेवारीला एलटीटी स्थानकातून मध्यरात्री १.१० वाजता सुटणार असून सावंतवाडी रोड स्थानकात सकाळी १൦. ३൦ वाजता दाखल होईल. तर, परतीच्या प्रवासासाठी २६ जानेवारीला ०११६२ ही गाडी सावंतवाडी रोड स्थानकातून दुपारी १२.३൦ वाजता रवाना होणार असून एलटीटी स्थानकात त्याच दिवशी रात्री १൦.२൦ वाजता दाखल होईल. 


या स्थानकांवर गाड्यांना थांबा

ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबेल.


परतीच्या प्रवासासाठी

तर, ०११५७ ही विशेष गाडी २७ जानेवरीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून मध्यरात्री १२.२൦ वाजता आणि सावंतवाडीला ही गाडी सकाळी १൦.३൦ वाजता पोहचणार आहे. परतीच्या प्रवासादरम्यान ०११५८ ही गाडी २७ तारखेला सावंतवाडी स्थानकातून दुपारी २ वाजता रवाना होणार असून सीएसएमटी स्थानकात ११.५५ वाजता दाखल होईल. या गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांवर थांबतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा