Advertisement

उन्हाळ्यात फिरायला जाताय? मग तुमच्यासाठी खूशखबर

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने ५൦ मेल/ एक्स्प्रेस गाड्यांना जादा डबे जोडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

उन्हाळ्यात फिरायला जाताय? मग तुमच्यासाठी खूशखबर
SHARES

उन्हाळी सुट्टीत बाहेर फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत चांगली बातमी आहे. मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्ट्यांसाठी गाड्यांना वाढीव डब्बे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने ५൦ मेल/ एक्स्प्रेस गाड्यांना जादा डबे जोडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


९ हजार ६०० प्रवाशांसाठी...

मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे उत्तर भारतासह कोकण, गोवा, कर्नाटकमध्ये जाणाऱ्या गाड्यांना हे जादा डबे जोडण्यात येतील. शिवाय, या सुविधेमुळे अतिरिक्त ९ हजार ६०० प्रवाशांची सोय होणार असल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मध्य रेल्वेने ५० गाड्यांना जादा डबे जोडले जाणार असून त्यात स्लीपर, एसी डब्यांचा समावेश आहे.


अशी असेल सेवा

  • कुठून - एलटीटी (कुर्ला)
  • कुठपर्यंत - करमाळी
  • गाडी क्रमांक - ०११९३
  • सुटणार कधी - २८ एप्रिल, ५ आणि १२ मे
  • करमाळीहून परतीसाठी गाडी क्रमांक - ०११९४
  • कधी - २८ एप्रिल, ५ आणि १५ मे

या गाडीला दोन स्लीपर आणि एक जादा एसी डबा जोडण्यात आला आहे.


एलटीटी ते मंगळुरू

  • गाडी क्र. ०११९५ ही मंगळुरू जंक्शन विशेष गाडी एलटीटीहून २९ एप्रिल, ६ आणि १३ मे रोजी सुटेल
  • परतीसाठी मंगळुरूहून क्र. ०११९६ ही गाडी २९ एप्रिल आणि ६, १३ मे रोजी सुटेल
  • या गाड्यांना दोन स्लीपर, एक एसीचा जादा डबा जोडला जाईल
  • एलटीटी ते वाराणसी, गोरखपूर तसंच, पुण्याहून पाटणाला जाणाऱ्या एक्स्प्रेसनाही जादा डबे जोडले जातील

हेही वाचा - 

माथेरान स्थानक झालं हरीत स्थानक!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा