माथेरान स्थानक झालं हरीत स्थानक!

ऊर्जाबचतीसाठी रेल्वेने २१ किमीच्या मार्गावर जुम्मापट्टी, वॉटरपाइप, अमन लॉज, माथेरान स्थानकांवर ५०० ते १००० वॅट पॉवरचे सोलार पॅनल बसवले आहेत. त्यासोबत ६ किलोवॅट वीजनिर्मीत करणारी पवनचक्की देखील बसवली आहे. स्थानकातील एलईडी बल्ब, पंख्यांच्या वापरातून वीज बिलात २ लाखांहून अधिक रकमेची बचत होणार आहे.

  • माथेरान स्थानक झालं हरीत स्थानक!
  • माथेरान स्थानक झालं हरीत स्थानक!
SHARE

मध्य रेल्वेच्या माथेरान स्थानकाची ओळख आता हरीत उर्जा स्थानक म्हणून होणार आहे. माथेरान रेल्वे स्थानकात सोलार पॅनल आणि पवनचक्की अशा अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करून वीजेची निर्मिती करण्याला प्राधान्य देण्यात आलं आहे. खासकरून मिनी ट्रेनच्या लोकप्रियतेत भर पडावी म्हणून मध्य रेल्वेने मिनी ट्रेनला वाफेचं इंजिन देखील बसवलं आहे.किती रुपयांची बचत?

ऊर्जाबचतीसाठी रेल्वेने २१ किमीच्या मार्गावर जुम्मापट्टी, वॉटरपाइप, अमन लॉज, माथेरान स्थानकांवर ५०० ते १००० वॅट पॉवरचे सोलार पॅनल बसवले आहेत. त्यासोबत ६ किलोवॅट वीजनिर्मीत करणारी पवनचक्की देखील बसवली आहे. स्थानकातील एलईडी बल्ब, पंख्यांच्या वापरातून वीज बिलात २ लाखांहून अधिक रकमेची बचत होणार असल्याचं मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितलं.पर्यटनासाठी विशेष प्रयत्न

मध्य रेल्वेने माथेरानच्या मिनी ट्रेनमध्ये हिमालयीन मिनी ट्रेनप्रमाणे बदल करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासह परदेशी पर्यटकांसाठी विशेष सहलींचं आयोजन करण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम महामंडळाबरोबर करार करण्यात आले आहेत. अलिकडेच मध्य रेल्वेने लोणावळा स्थानकाला ग्रीन एनर्जी स्थानकाचा दर्जा दिला असून त्यानंतर मानखुर्द स्थानकातही ग्रीन एनर्जीचा वापर करण्याचं ठरविलं आहे.हेही वाचा-

आयआरसीटीवर उपलब्ध होणार मिनी ट्रेनचं तिकीटसंबंधित विषय
ताज्या बातम्या