Advertisement

आयआरसीटीवर उपलब्ध होणार मिनी ट्रेनचं तिकीट

आतापर्यंत प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. पण, पहिल्यांदाच मिनी टॉय ट्रेनचं तिकीट आयआरसीटीसीवर उपलब्ध होणार असल्याचं मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजयकुमार जैन यांनी सांगितलं आहे.

आयआरसीटीवर उपलब्ध होणार मिनी ट्रेनचं तिकीट
SHARES

माथेरानची राणी म्हणजेच मिनी ट्रेनचं तिकीट आता आयआरसीटीसीवर उपलब्ध होणार आहे. टूरिझमच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातून, तसेच परदेशातूनही अनेक प्रवासी पर्यटक माथेरानच्या मिनी ट्रेनला अनेकदा भेट देतात. त्यांना सहजरित्या तिकीट उपलब्ध व्हावं, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

आतापर्यंत प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. पण, पहिल्यांदाच मिनी टॉय ट्रेनचं तिकीट आयआरसीटीसीवर उपलब्ध होणार असल्याचं मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजयकुमार जैन यांनी सांगितलं आहे.


वाफेवर धावणार मिनी ट्रेन!

माथेरानची राणी मिनी ट्रेन आता वाफेवरही धाऊ शकणार आहे. तसा प्रयोग येत्या १४ एप्रिलला करण्यात येणार आहे. मिनी ट्रेनला हेरिटेज लूक देण्यासाठी वाफेवर धावणारे (स्टीम लोको) इंजिन ट्रेनला जोडण्यात येणार आहे. हे इंजिन जोडून मिनी ट्रेनची तिसरी चाचणी बुधवारी मध्य रेल्वेकडून घेण्यात आली, अशी माहिती संजयकुमार जैन यांनी दिली.


डिझेलच्या वाफेवर धावणार इंजिन

पर्यावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष लक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी हे इंजिन कोळशावर न धावता डिझेलवर धावणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दोन महिन्यात या इंजिनाच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आणखी एक चाचणी बुधवारी झाली. आधी कोळशाचा वापर करून वाफेवर धावणारे इंजिन होते. पण, आता कोळशाचा वापर न करता डिझेलचा वापर करून वाफ तयार केली जाईल आणि त्यावर मिनी ट्रेन धावेल.


वाफेच्या इंजिनामुळे प्रदूषण कमी

सध्या माथेरान मिनी ट्रेनला डिझेल इंजिन आहे. अशी जवळपास तीन इंजिन आहेत. ते फक्त डिझेलवर धावतात. पण, वाफेवर धावणारे इंजिन लावून प्रदूषण आणखी कमी होईल आणि एक वेगळा लूक येईल, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. हे इंजिन नव्याने बनवण्यात आले आहे. सध्या नेरळ ते माथेरान ट्रेनच्या चार आणि अमन लॉज ते माथेरानच्या २० फेऱ्या होतात.



हेही वाचा

नेरळ-माथेरानच्या फेऱ्यांमध्ये वाढ


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा