२६ जानेवारीपासून धावणार नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन


SHARE

माथेरानला फिरण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर अाहे. गेल्या वर्षभरापासून बंद पडलेली नेरळ ते माथेरान ही मिनी ट्रेनची सेवा २६ जानेवारीपासून म्हणजेच प्रजासत्ताक दिनापासून सुरू करण्यात येणार अाहे. वर्षभर ही सेवा बंद असल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. ३൦ ऑक्टोबरपासून अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू करण्यात आली होती. अाता ही सेवा थेट नेरळ स्थानक ते माथेरान अशी सुरू होणार आहे.


अाठ डब्यांची मिनी ट्रेन धावणार

मिनी ट्रेन सुरू करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन गांभीर्याने प्रयत्न करत होतं. त्यानुसार ४ जानेवारीला नेरळ-माथेरान मार्गावर आठ डब्यांच्या मिनी ट्रेनची सुरक्षा चाचणी रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतली होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता २६ जानेवारीपासून मिनी ट्रेन आठ डब्यांची चालवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना, पर्यटकांना आणि येथील स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


नियोजनाआधीच सेवा प्रवाशांच्या दिमतीला

प्रशासनानं मार्च २०१८ पासून नेरळ ते माथेरान अशी सेवा सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. पण त्याआधीच ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे डीआरएम एस. के. जैन यांनी दिली.


हेही वाचा - 

माथेरानच्या मिनी ट्रेनची धमाल! फेऱ्या वाढल्या!

माथेरानची मिनी ट्रेन सुसाट, ८ दिवसांत ५ लाखांची कमाई


संबंधित विषय
ताज्या बातम्या