माथेरानच्या मिनी ट्रेनची धमाल! फेऱ्या वाढल्या!


SHARE

हिवाळ्यात हिल स्टेशनवर जाऊन मस्तपैकी सुट्टी एन्जॉय करावीशी वाटते. त्यातच हिल स्टेशन म्हटलं की माथेरान हे सर्वांच्याच आवडीचं ठिकाण. आता हिवाळ्याच्या निमित्ताने माथेरानच्या मिनी ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत मिनी ट्रेनच्या अमन लॉज ते माथेरानसाठी ६ अप आणि ६ डाऊन फेऱ्या चालवल्या जात होत्या. पण, आता मंगळवारपासून मिनी ट्रेनच्या २ अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जातील.


अशा असतील अतिरिक्त फेऱ्या

२ महिन्यांपूर्वीच माथेरानची मिनी ट्रेन सुरू करण्यात आली आहे. तेव्हा ६ अप आणि ६ डाऊन अशा फेऱ्या बुधवार आणि गुरुवार वगळता चालवण्यात येत होत्या. तर, फक्त बुधवारी ५ डाऊन आणि ६ अप फेऱ्या तर, गुरुवारी ६ डाऊन तर ५ अप फेऱ्या चालवण्यात येत होत्या.

पण, नव्या निर्णयानुसार ७ डाऊन आणि ७ अप फेऱ्या (बुधवार आणि गुरुवार वगळून) चालवण्यात येतील. बुधवारी ५ डाऊन आणि ६ अप फेऱ्या तर गुरुवारी ७ डाऊन आणि ६ अप फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.


अमन लॉज ते माथेरान (गुरुवार वगळता)

 • ट्रेन क्र. ५२१४५
 • सुटणार कधी - सकाळी 0९.२५
 • पोहोचणार कधी - सकाळी ९.५०


माथेरान ते अमन लॉज (गुरुवार वगळता)

 • ट्रेन क्र. ५२१४६
 • सुटणार कधी - सकाळी ८.५० वाजता
 • पोहोचणार कधी - सकाळी ९.१५ वाजता


अमन लॉज ते माथेरान (रोज)

 • ट्रेन क्र. ५२१४७
 • सुटणार कधी - सकाळी १०.३५
 • पोहोचणार कधी - सकाळी ११ वाजता


माथेरान ते अमन लॉज (रोज)

 • ट्रेन क्र. ५२१४८
 • सुटणार कधी - सकाळी १० वाजता
 • पोहोचणार कधी - सकाळी १०.२५


अमन लॉज ते माथेरान (रोज)

 • ट्रेन क्र. ५२१४९
 • सुटणार कधी - सकाळी ११.४५
 • पोहोचणार कधी - दुपारी १२.१०


माथेरान ते अमन लॉज (रोज)

 • ट्रेन क्र. ५२१५०
 • सुटणार कधी - सकाळी११.१०
 • पोहोचणार कधी - ११.३५


अमन लॉज ते माथेरान

 • ट्रेन क्र. ५२१५१
 • सुटणार कधी - दुपारी १.३५
 • पोहोचणार कधी - दुपारी २.००


माथेरान ते अमन लॉज (रोज)

 • ट्रेन क्र. ५२१५२
 • सुटणार कधी - दुपारी १.००
 • पोहोचणार कधी - दुपारी १.२५


अमन लॉज ते माथेरान

 • ट्रेन क्र. ५२१५३
 • सुटणार कधी - दुपारी २.४५
 • पोहोचणार कधी -दुपारी ३.१०


माथेरान ते अमन लॉज (रोज)

 • ट्रेन क्र. ५२१५४
 • सुटणार कधी - दुपारी २.१०
 • पोहोचणार कधी - दुपारी २.३५


अमन लॉज ते माथेरान

 • ट्रेन क्र. ५२१५५
 • सुटणार कधी - दुपारी ४.१५
 • पोहोचणार कधी -दुपारी ४.४०


माथेरान ते अमन लॉज (रोज)

 • ट्रेन क्र. ५२१५६
 • सुटणार कधी - दुपारी ४.५०
 • पोहोचणार कधी - दुपारी ५.१५


अमन लॉज ते माथेरान (बुधवार वगळता)

 • ट्रेन क्र. ५२१५६
 • सुटणार कधी - दुपारी ४.५०
 • पोहोचणार कधी - दुपारी ५.१५


माथेरान ते अमन लॉज (बुधवार वगळता)

 • ट्रेन क्र. ५२१५७
 • सुटणार कधी - संध्याकाळी ५.२५
 • पोहोचणार कधी - संध्याकाळी ५.५०

हेही वाचा

17 महिन्यांनी सुरू झाली 'माथेरानची राणी'


संबंधित विषय
ताज्या बातम्या