Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

17 महिन्यांनी सुरू झाली 'माथेरानची राणी'


17 महिन्यांनी सुरू झाली 'माथेरानची राणी'
SHARES

अपघातांमुळे वर्षभर यार्डात असणारी बच्चे कंपनीची आवडती ‘माथेरानची राणी’ एकदाची सुरू करण्यात आली आहे. 30 ऑक्टोबरपासून माथेरानच्या राणीचा प्रवास सुरू झाला आहे. सुरुवातीला शटल सर्व्हिस म्हणून अमन लॉज ते माथेरानपर्यंतच ती चालवण्यात येणार आहे.


म्हणून होती मिनी ट्रेन बंद...

माथेरानची मिनी ट्रेन रुळावरून घसरण्याच्या सलग दोन घटना 2016 मधील एप्रिल महिन्याच्या अखेरीस आणि मे महिन्याच्या सुरुवातीला घडल्या. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. मध्य रेल्वे प्रशासनाने कामात हलगर्जी केल्याबद्दल एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई देखील केली. यानंतर रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार सुरक्षा उपाय योजण्यासाठी चार सदस्यांची एक स्वतंत्र समितीचीही स्थापना करण्यात आली.


मिनी ट्रेनमध्ये केल्या बऱ्याच सुधारणा

या समितीने दिलेल्या अहवालाप्रमाणे, मिनी ट्रेनमध्ये सुधारणा करण्याबरोबरच प्रवाशांसाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या. या गाडीला एअर ब्रेक बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षेसाठी घाट सेक्शनमध्ये दरीच्याकडेला 650 मीटरची भिंतही बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.


डब्याची स्थिती खालीलप्रमाणे -

या मिनी ट्रेनला तीन सेकंड क्लास, एक फर्स्ट क्लासचा डबा आणि दोन ब्रेक व्हॅन, किंवा चार सेकंड क्लासचे डबे आणि दोन ब्रेक व्हॅनचे डबे या शटल ट्रेनला जोडलेले असतात.


मिनी ट्रेनचे भाडे

अमन लॉज ते माथेरान शटल सर्व्हिस 

फर्स्ट क्लास
सेकंड क्लास

प्रौढ - 300 रु.
प्रौढ - 45 रू.
मुले - 180 रु.
 मुले - 30 रू.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा