Advertisement

मुंबईहून निघालेलं हेलिकॉप्टर गायब


मुंबईहून निघालेलं हेलिकॉप्टर गायब
SHARES

मुंबईहून सकाळी साडे दहाच्या सुमारास उड्डाण घेतलेलं पवनहंस कंपनीचं हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी जुहू विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अचानक हे हेलिकॉप्टर रडारवरून गायब झालं.


कसं गायब झालं हेलिकॉप्टर?

या हेलिकॉप्टरमध्ये ओएनजीसी कंपनीचे ५ कर्मचारी आणि दोन पायलटसह सात जण प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच हे हेलिकॉप्टर रडारवरून गायब झालं. एअर ट्रॅफिक कंट्रोलशी या हेलिकॉप्टरचा संबंध तुटला.


कोस्ट गार्ड घेणार शोधमोहिम हाती

ही घटना समोर येताच ओएनजीसीने कोस्ट गार्डला त्याबाबत माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाण केल्यानंतर साधारणपणे ९ किलोमीटरपर्यंत त्यांचा एअर ट्रॅफिक कंट्रोलरशी संबंध होता. मात्र, त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. कोस्ट गार्डकडून लवकरच शोध मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा