Advertisement

ई-शिवनेरी बस सुरू, तिकीट दर, कुठून कुठे धावणार सर्व जाणून घ्या

महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ई-शिवनेरी बसचे लोकार्पण करण्यात आले.

ई-शिवनेरी बस सुरू, तिकीट दर, कुठून कुठे धावणार सर्व जाणून घ्या
SHARES

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या ताफ्यात ई-शिवनेरी दाखल झाली आहे. महाराष्ट्रदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ई-शिवनेरी बसचे लोकार्पण करण्यात आले. 

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, हिंदूह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

तसेच यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांची एसटीचे सदिच्छा दूत म्हणून घोषणा करण्यात आली.

येत्या दोन महिन्यात मुंबई-ठाणे-पुणे अशा १०० शिवनेरी बसेस इलेक्ट्रिकवर धावणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

काय आहे ईलेक्ट्रिक बसचे वैशिष्ट्य

संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा, आरामदायी आसने, प्रत्येक प्रवाशासाठी मोबाइल चार्जिंग आणि प्रकाशदिवे उपलब्ध असतील.

बॅगा ठेवण्यासाठी बसच्या बाजूला स्वतंत्र व्यवस्था असेल.

बसमध्ये ४३ प्रवासी बसू शकतात.

एकदा बॅटरी संपूर्ण चार्ज केल्यावर ३०० किलोमीटरचा टप्पा पार करण्याची क्षमता या बसमध्ये आहे.

ईलेक्ट्रिक बसमुळे प्रदूषणमुक्त प्रवास होतो आणि इंधनावरील खर्च कमी करण्यास मदत होते.

आरामदायी प्रवास होतो आणि या बसचा रस्त्यावर धावतांना आवाजही येत नाही.

प्रवाशांच्या सुरक्षेवरही भर देण्यात आला आहे.

किती आहे तिकीट दर?

सध्या मुंबई-पुणे दरम्यानडिझेलवर चालणाऱ्या शिवनेरी बसचे तिकीट ५१५ रुपये आहे. पण डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसची ऑपरेटिंग कॉस्ट कमी आहे.

ऑपरेटिंग कॉस्ट कमी असल्याने त्याचा लाभ प्रवाशांना मिळेल अशी अपेक्षा आहे. म्हणजेच तिकीट दर कमी होतील, अशी आशा आहे. पण सध्यातरी ई-शिवनेरीचे तिकीट दर हे ५१५ रुपये इतकेच ठेवण्यात आले आहे. 


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा