Advertisement

लोकलचं सॅनिटायझेशन करण्यात 'मरे' 'परे'पेक्षा एक पाऊल पुढे


लोकलचं सॅनिटायझेशन करण्यात 'मरे' 'परे'पेक्षा एक पाऊल पुढे
SHARES

मागील २ महिने बंद असलेली मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. लोकल प्रवासासाठी प्रवाशांना काही नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. मात्र, असं असलं तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य व पश्चिम रेल्वे लोकलचं सॅनिटायजेशन करत आहे. परंतु, लोकलची स्वच्छता करण्यात मध्य रेल्वे अधिक भर दिल्याची माहिती समोर येत आहे. सॅनिटायजेशन करण्यात पश्चिम रेल्वेपेक्षा मध्य रेल्वेचे काम वेगाने सुरू आहे.

गर्दीमुळे लोकलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजत आहेत. त्यामुळं मध्य रेल्वे प्रशासन लोकलची एक फेरी पूर्ण झाल्यावर स्वच्छता कर्मचारी सॅनिटायजरची फवारणी लोकलवर करतात. तर, पश्चिम रेल्वे प्रशासन दिवसातून दोनदा लोकल सॅनिटायजेशन करते. मध्य रेल्वे प्रशासन कोरोनाबाबत जनजागृतीसह स्वच्छता करण्यात आघाडीवर आहे. लोकल, श्रमिक विशेष ट्रेन यांची स्वच्छता करण्यासाठी जंतुनाशक औषधांचा वापर केला जात आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सीएसएमटी इथं उभी राहताच निर्जंतुकीकरणासाठी तिच्यावर सॅनिटायजर फवारलं जातं. बाहेरून आणि आतून लोकलवर फवारा मारला जातो. त्यानंतर ही लोकल दुसऱ्या फेरीसाठी वापरली जाते. लोकल सॅनिटाइज करण्यासाठी ३ कर्मचारी आहेत. यासह कारशेडमध्ये संपूर्णरित्या आतून-बाहेरून मशीनद्वारे लोकलची स्वच्छता केली जाते.

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल दिवसातून २ वेळा सॅनिटाइज होते. सकाळच्या सत्रात धावणाऱ्या लोकल दुपारनंतर सॅनिटायजरनं स्वच्छ केल्या जातात. या लोकल कारशेडमध्ये रवाना केल्या जातात. दुपारच्या सत्रात दुसऱ्या लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर धावतात. या लोकलच्या सर्व फेऱ्या संपल्यावर लोकल सॅनिटाइज केल्या जातात.



हेही वाचा -


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा