Advertisement

भारतीय रेल्वेला 'श्रमिक'मधून मिळलं ४२८ कोटींचं उत्पन्न

भारतीय रेल्वेला जून अखेरीपर्यंत ४२८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालं असून तब्बल ६३ लाख श्रमिकांनी प्रवास केला.

भारतीय रेल्वेला 'श्रमिक'मधून मिळलं ४२८ कोटींचं उत्पन्न
SHARES

मुंबईसह देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनमुळं अनेकांचे रोजगार गेले व अनेकांना आपला आर्थिक खर्च भागवणं कठीण झालं होतं. त्यामुशं देशभरात अडकडलेल्या परप्रांतियांनी आपल्या गावची वाट धरली. यावेळी या मजूर, श्रमिकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली होती. भारतीय रेल्वेनं यांच्यासाठी श्रमिक विशेष ट्रेन सुरू केली होती. या ट्रेनमुळं भारतीय रेल्वेला जून अखेरीपर्यंत ४२८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळालं असून तब्बल ६३ लाख श्रमिकांनी प्रवास केल्याची माहिती समोर येत आहे.

रेल्वे मंत्रालय, रेल्वे मंडळ यांच्याकडून माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी माहितीच्या अधिकारातून मिळविलेल्या माहितीनुसार कामगार दिनी म्हणजे  १ मे रोजीपासून भारतीय रेल्वे श्रमिक विशेष ट्रेन सुरु केली. तेव्हापासून ते २९ जूनपर्यंत या ट्रेनमधून ६२ लाख ९१ हजार १२६ मजूर आपल्या मूळगावी पोहचले आहेत. सर्व मजुरांचे गाडीत चढण्यापूर्वी स्क्रिनिंग केले जात आहे. प्रवाशांना गाडीत मोफत जेवण आणि पाणी पुरवले जात आहे.

या श्रमिक विशेष ट्रेन उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, आंध्रप्रदेश, चंदिगड, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पुदूचेरी, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल अशा वेगवेगळ्या राज्यांतून सोडण्यात आल्या. या श्रमिक विशेष ट्रेन आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, छत्तिसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मिझोराम, नागालँड, ओरिसा, राजस्थान, तामिळनाडू, तेलगंणा, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यात परतल्या. यातून भारतीय रेल्वेला एकूण ४२८ कोटी उत्पन्न मिळालं.

लॉकडाउनमुळं देशभरात अडकलेल्या मजूर, श्रमिकांना आंतरराज्य प्रवासासाठी रेल्वे प्रशासनानं ‘श्रमिक विशेष’ ट्रेन सेवा सुरु केली. राज्यात लॉकडाऊन लागू केल्यावर मजूरांचं काम ठप्प झालं. त्यामुळं मजूर एकाच ठिकाणी अडकून पडले होते. या मजुरांच्या जेवणाची गैरसोय व्हायला लागली. परिणामी, केंद्र आणि राज्य सरकारद्वारे श्रमिक विशेष ट्रेन १ मेपासून सुरु केल्या. 



हेही वाचा -

Online School: बालवाडी ते १२ वी ‘असा’ होईल अभ्यास, आॅनलाईन वर्गांचं वेळापत्रक जाहीर

Lower Parel Bridge लोअर परळ पुलाचं काम २०२१ पर्यंत होणार पूर्ण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा