Advertisement

हार्बर मार्गावर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष रेल्वे सेवेची मागणी


हार्बर मार्गावर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष रेल्वे सेवेची मागणी
SHARES

लॉकडाऊनमुळं मागील २ महिने बंद असलेली लोकल हळुहळू पूर्वपदावर येत आहे. मध्य रेल्वे प्रशासनानं रेल्वे कर्मचाऱ्यांचा विचार करत लोकल सेवा सुरू केली आहे. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठीच ही लोकल सुरू करण्यात आली असून, यामधून सामान्यांना प्रवासाची मुभा नाही. तसंच, लॉकडाऊन कालावधीत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष रेल्वेची सुविधा करण्यात आली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर ही सेवा धावते. मात्र, २ जूनपासून हार्बर मार्गावर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष रेल्वे धावत नसल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिली.

मध्य रेल्वे मार्गावर धावत असलेल्या लोकल, एक्सप्रेसमध्ये फिजिकल डिस्टन्सचं पालन होत नसल्यानं १ जून रोजी रेल्वे कर्मचाऱ्यांनी विद्याविहार इथं आंदोलन केलं. परंतु, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीपासून हार्बर मार्गावरून लोकल, एक्सप्रेस धावत नसल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिली. परिणामी, हार्बर मार्गावरील कर्मचाऱ्यांना कार्यालय गाठणं कठीण झालं आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण २२ विशेष रेल्वे धावत आहेत. मात्र मध्य रेल्वे मार्गावर ७ विशेष रेल्वे धावत आहेत. परिणामी, फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी जादा विशेष रेल्वे सोडणं आवश्यक आहे. मागील ५ दिवसापासून हार्बर मार्गावर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विशेष रेल्वे धावत नाही. त्यामुळं कर्मचाऱ्यांनी कार्यालयात कसे पोहचायचं हा प्रश्न सतावत आहे. यामुळं रेल्वे प्रशासनानं रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी त्वरित विशेष रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाकडून करण्यात आली आहे.



हेही वाचा -

कर्मचाऱ्यांसाठी धावणार एसटीच्या अतिरिक्त २५० बसेस

कौतुकास्पद! जे.जे मार्ग पोलिस ठाण्यातील 32 पोलिसांची कोरोनावर मात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा