जे.जे मार्ग पोलिस ठाण्यातील 32 पोलिसांची कोरोनावर मात

ज्यावेळेस येथे 26 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह होते, तेव्हा पोलिस आयुक्तांनी स्वतः याठिकाणी भेट देत पोलिसाचे मनोबल वाढवित काळजी घेण्याचे आवाहन केले होते.

जे.जे मार्ग पोलिस ठाण्यातील 32 पोलिसांची कोरोनावर मात
SHARES
मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असताना, नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिस ही या महामारीला बऴी पडले. सर्वाधिक जेजे पोलिस ठाण्यातील पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती. माञ यातील 32 पोलिसांनी कोरोनावर मात करून पून्हा ड्युटीवर हजर झाले आहेत. तर उर्वरित 10 पोलिसांमध्ये कोरोनाचे अतिसौम्य लक्षणे आढळून आली असून ते सध्या क्वारनटाइन असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव भोळे यांनी सांगितले.

 
जेे.जे. मार्ग पोलिस ठाणे परिसरात अनेक चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये हे पोलिस त्यांचे कर्तव्य बजावत होते. या परिसरात कोरोना बाधित नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या 59 पोलिसांना कोरोनाची लागन झाली. पुढेे हा आकडा वाढत  वर पोहचला. त्याच वेळी पोलिसांमधील कोरोनाचेे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने केंद्राकडून आलेल्या राज्य राखीव पोलिसांद्वारे गस्त वाढवली. पुढेे त्यातील 14 जणांना कोरोना झाल्याचे पुढे आले.ज्यावेळेस येथे 26 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह होते, तेव्हा पोलिस आयुक्तांनी स्वतः याठिकाणी भेट देत पोलिसाचे मनोबल वाढवित काळजी घेण्याचे आवाहन केले होते.


जे.जे  परिसरात रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे सुरूवातीच्या काळातच अनेक पोलिसांनाही त्याची लागण झाली. त्यामुळे पोलिसांनी जागृती व समुपदेशन देण्यास पोलिसांना सुरूवात केली. सध्या कोरोना झालेल्या पोलिसांची संख्या ही 46 असून त्यातील 32 जणांनी कोरोनावर मात करत ते पून्हा सेवेत रुजू झाले आहेत. तर उर्विरत पोलिसांमध्ये ही कोरोनाची अतिसौम्य लक्षणे असून ते सध्या क्वारनंटाईन आहेत. सेवेत पून्हा हजर झालेल्या त्याच बरोबर इतर पोलिसांना थर्मास देण्यात आले असून त्याच्या सहाय्याने पोलिसांना नियमीत गरम पाणी प्यायला मिळते. तसेच सर्वजण घरूनच जेवण घेऊन येतात. याशिवाय पोलिसांना प्रतिबंधात्मक गोळ्या, विटामिनच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिस ठाण्यात कोणताही नवा कोरोना रुग्ण अद्याप समोर आलेला नसल्याचेे पोलिसांनी सांगितले.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा