Advertisement

१ जूनपासून २०० नॉन एसी रेल्वेगाड्या नियोजित वेळेनुसार धावणार


१ जूनपासून २०० नॉन एसी रेल्वेगाड्या नियोजित वेळेनुसार धावणार
SHARES

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मुळगावी पाठविण्यासाठी रेल्वे प्रशासनान १५ विशेष ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता येत्या १ जूनपासून देशभरात २०० नॉन एसी रेल्वे गाड्या नियोजित वेळेनुसार धावणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे.

रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटवर याबाबत माहिती दिली आहे. 'भारतीय रेल्वे १ जून पासून नियोजित वेळापत्रकानुसार दररोज २०० एसी रेल्वे सुरु करणार आहे. या रेल्वेंसाठी तिकिट बुकिंग लवकरच सुरु करण्यात येईल. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे देशभरात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना दिलासा मिळेल', असं त्यांनी म्हटलं.

'देशातील सर्व राज्य सरकारांना विनंती आहे की, त्यांनी मजुरांना मदत करावी. मजुरांची नाव नोंद करुन त्याची अचूक माहिती रेल्वे प्रशासनाला द्यावी, जेणेकरुन मजुरांना विशेष ट्रेनमार्फत त्यांच्या गावी सोडता येईल', अशी विनंती रेल्वे मंत्र्यांनी देशातील सर्व राज्य सरकारांना केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा