Advertisement

कुर्ला वाशी दरम्यान 'या' तारखेला एकही लोकल धावणार नाही

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

कुर्ला वाशी दरम्यान 'या' तारखेला एकही लोकल धावणार नाही
SHARES

रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार 10 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉक दरम्यान हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला वाशी दरम्यान एकही लोकल धाणार नाही. 

तर, ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील अनेक लोकल रद्द होणार आहेत. तर, अनेक लोकल उशीराने धावतील. यामुळे प्रवाशांना वेळेचे नियोजन करुनच घराबाहेर पडावे लागणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबून आपल्या गंतव्यस्थानी 10 मिनिटे उशीराने पोहचतील. 

सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त वळवण्यात येतील आणि दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुढे मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि आपल्या गंतव्यस्थानी 10 मिनिटे उशीराने पोहचतील. 

कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी  11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत  वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि  पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. 

तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि कुर्ला तसेच  पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.



हेही वाचा

महिलांसाठी एसी ट्रेनमध्ये अधिक जागा उपलब्ध होण्याची शक्यता

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा