मध्य रेल्वेच्या (central railway) मुंबई (mumbai) विभागाने रेल्वे रुळ, स्थानके आणि रेल्वे परिसर स्वच्छ करण्यासाठी आणखी एक अभिनव पाऊल उचलले आहे. मेकॅनिकल शाखेने इनहाऊस बॅटरी ऑपरेटेड पोर्टेबल बॅकपॅक प्रकारचे व्हॅक्यूम मशीन बननले आहे. हे मशीन अत्यंत किफायतशीर आणि देखभाल करण्यास सोईस्कर आहे.
कचरा गोळा करण्यासाठी बास्केटला जोडलेल्या पीव्हीसी पाईपसह 20 व्होल्ट डीसी पॉवर सप्लायवर चालणारा हा रिचार्ज करण्यायोग्य बॅकपॅक आहे. उदाहरणार्थ, 50 मीटर अंतरापर्यंत कचरा गोळा करण्यासाठी साधारणत: 20 मिनिटे लागतात. तर तेच काम मशीन 10 मिनिटांत करते. कागद, काच, प्लास्टिक, टेट्रापॅक, कापड, ॲल्युमिनियम फॉइल, बाटल्या इत्यादी 50 लिटर कचरा एकाच वेळी गोळा करण्याची क्षमता यात आहे. तसेच याद्वारे कचरा व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी बायो-डिग्रेडेबल आणि नॉन बायो-डिग्रेडेबल वस्तू स्वतंत्रपणे गोळा केल्या जाऊ शकतात.
मुंबई विभागात सध्या असे 2 व्हॅक्यूम क्लीनर संच आहेत. संपूर्ण विभागात त्यांचा वापर करण्यासाठी आणखी 116 संच खरेदी करण्याची योजना आहे. प्रत्येक संचाची अंदाजे किंमत 25,000/- आहे.
बॅटरी ऑपरेटेड पोर्टेबल बॅकपॅक प्रकार व्हॅक्यूम कचरा गोळा करण्याचे फायदे
मध्य रेल्वेच्या मुंबई (mumbai) विभागाला या कामगिरीचा खूप अभिमान वाटतो. मध्ये रेल्वेनुसार, प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि आरामदायी प्रवास अनुभव देण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवू.
हेही वाचा