Advertisement

मध्य आणि हार्बर रेल्वेचा मेगाब्लॉक


मध्य आणि हार्बर रेल्वेचा मेगाब्लॉक
SHARES

उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार 10 सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक असणार आहे.


मध्य रेल्वे

मुंलुड ते मांटुगा स्थानकांदरम्यान सकाळी ११.२० ते संध्याकाळी ४.२० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येतील. ब्लॉकदरम्यान ठाण्याहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या सकाळी १०.५८ ते संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावरून चालवण्यात येतील. या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन स्थानकांवर थांबणार असून मांटुगानंतर अप धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. 

ब्लॉकदरम्यान सीएसटीएमहून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या सकाळी १०.८ ते दुपारी २.४२ या वेळेत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या स्थानकांत थांबतील. सीएसटीएमला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धीम्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या सकाळी ११ ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने धावणार आहे.


हार्बर रेल्वे

हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येतील. ब्लॉकच्या कालावधीत सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३७ सीएसटीएम ते वाशी, बेलापूर, पनवेलहून सुटणाऱ्या लोकल तसेच सकाळी १०.२० ते दुपारी ३.४८ वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशी ते सीएसटीएमपर्यंतची लोकल सेवा बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटीएम ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष गाड्या चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ट्रान्सहार्बर आणि मुख्य मार्गाने प्रवास करू शकतात.



डाऊनलोड करा Mumbai live APP  आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा