• नव्या वर्षात प्रवाशांना नवी भेट
SHARE

करीरोड - नवीन वर्षात मध्यरेल्वेच्या स्थानकांवर प्रवाशांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. येत्या वर्षात करीरोड स्थानकावर नवे तिकीटघर बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर उन्नत तिकीट बुकिंग कार्यलय या स्थानकावर स्थापन करण्यात येणार आहे. अपंग प्रवाशांसाठी ए वन दर्जाचे बायो - टॉयलेट या स्थानकावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. याची अंमलबजावणी 2017 मध्ये टप्प्या- टप्प्याने केली जाणार आहे.

तिकीट घरापुढे वाढत जाणारी प्रवाशांच्या रंगांमुळे प्रचंड प्रमाणात गर्दी होते. याशिवाय ये-जा करताना प्रवाशांना त्रास होतो. तर करीरोड स्थानकाच्या प्रवेश द्वारावर पुरेशी जागा नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. येत्या नव्या वर्षात त्यातून मुक्तता मिळेल हीच रेल्वे प्रशासनाकडून अपेक्षा करत असल्याची प्रतिक्रिया प्रवाशी अच्युत पाडावे यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या