Advertisement

एसटी प्रवाशांना ओटीसी कार्डद्वारे मिळणार तिकीट

सुरक्षेच्या दृष्टीनं वाहक आणि प्रवाशांमधील रोख रक्कमेचा व्यवहार टाळण्यासाठी ओटीसीची सेवा सुरू करण्यात आली आहे.

एसटी प्रवाशांना ओटीसी कार्डद्वारे मिळणार तिकीट
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं एसटी महामंडळ (msrtc) आपल्या कर्मचारी व प्रवाशांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. एसटी वाहक आणि प्रवाशांमधील (passenger) रोख रक्कमेची देवाणघेवाण टाळण्यासाठी ओटीसी (ओव्हर द काऊंटर) कार्डद्वारे प्रवास भाडे (ticket) भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

लॉकडाऊन शिथिल होताच एसटीने राज्यभर वाहतूक सुरू केली. प्रवासादरम्यान कोरोनाच्या संसर्गाचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनं वाहक आणि प्रवाशांमधील रोख रक्कमेचा व्यवहार टाळण्यासाठी ओटीसीची सेवा सुरू करण्यात आली आहे. हे कार्ड एटीएमप्रमाणे डेबिट कार्डचे काम करणार आहे.

या कार्डवर कोणत्याही प्रकारचा फोटो किंवा कार्डधारकाचे नाव नसून ते मे. ट्रायमक्स कंपनीच्या खासगी एजंटकडून उपलब्ध होणार आहे. त्यासाठी प्रवाशाला नाव आणि मोबाइल क्रमांक एजंटला द्यावा लागणार आहे. या कार्डमध्ये प्रवाशांना १०० रुपयांच्या पटीत रिचार्ज करावे लागेल. यामध्ये ट्रॅव्हल वॉलेट आणि शॉपिंग वॉलेटचा समावेश आहे.

या कार्डचा वापर कुटुंबातील सर्व सदस्य करू शकतात. प्रवाशांना प्रवासादरम्यान हे कार्ड वाहकाकडे दाखवायचे आहे. त्यासाठी कोणत्याही ओखळपत्राची आवश्यकता नाही. प्रवासी या कार्डद्वारे खरेदीही करू शकतील.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा