Advertisement

७२ तासांचा मेगा ब्लॉक ; कोकण रेल्वेच्या २० गाड्या रद्द

कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील २० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

७२ तासांचा मेगा ब्लॉक ; कोकण रेल्वेच्या २० गाड्या रद्द
SHARES

कोकण रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील २० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेनं मुंबई विभागात ठाणे आणि दिवा स्थानकदरम्यान ७२ तासांचा मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळं कोकण रेल्वे मार्गांवरील अनेक गाड्याचे वेळापत्रक ५, ६ आणि ७ फेब्रुवारीस विस्कळीत झाले आहे.

कोकण रेल्वेकडून याबाबतच अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. मध्य रेल्वेने मुंबई विभागात ठाणे ते दिवा या स्थानका दरम्यान ५, ६ आणि ७ फेब्रुवारी दरम्यान मेगा ब्लॉक घोषित केल्याचे पत्रकात म्हटलं आहे. दरम्यान या मेगा ब्लॉकमुळं कोकण रेल्वेने नियोजीत वेळापत्रक मोठा बदल केला आहे.

या कालावधीत जवळपास २० गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने त्याची माहिती ट्विट करुन जाहीर केली आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा