महालक्ष्मीजवळ ओव्हरहेड वायर तुटली, प. रेल्वेवरील वाहतूक धिम्या गतीने सुरू


  • महालक्ष्मीजवळ ओव्हरहेड वायर तुटली, प. रेल्वेवरील वाहतूक धिम्या गतीने सुरू
  • महालक्ष्मीजवळ ओव्हरहेड वायर तुटली, प. रेल्वेवरील वाहतूक धिम्या गतीने सुरू
SHARE

ऐन गर्दीच्या वेळेस मुंबई सेंट्रल आणि महालक्ष्मी रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी युद्धपातळीवर काम करून सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी लोकलसेवा पूर्ववत केली असली, तरी आॅफिस, उद्योगधंद्यावरून घरी निघालेल्या मुंबईकरांना प्रचंड गर्दीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

  

संध्याकाळी आॅफिस अवरमध्ये ६ वाजून ३५ मिनिटांनी मुंबई सेंट्रल आणि महालक्ष्मी रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. परिणामी चर्चगेटवरून विरारच्या दिशेने तसंच विरारकडून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या अप आणि डाऊन अशा चारही मार्गावरील वाहतूक बंद झाली. सर्व गाड्या आहे त्या ठिकाणीच उभ्या राहिल्या. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करून लोकलसेवा पूर्ववत केली. परंतु धिम्या आणि जलद मार्गावरील गाड्या ३५ मिनिटे उशिराने धावत असल्याने सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे.  

संबंधित विषय
ताज्या बातम्या