Advertisement

महिला प्रवाशांसाठी 'बेस्ट'चं विशेष नियोजन

बेस्टमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून, सद्यस्थितीत २७ लाखांहून अधिक झाली आहे. यातून २ कोटी १५ लाख रुपये उत्पन्नही मिळू लागलं आहे.

महिला प्रवाशांसाठी 'बेस्ट'चं विशेष नियोजन
SHARES

आपल्या दैनंदिन जीवनात रेल्वे प्रवासानंतर अनेक प्रवासी हे बेस्ट प्रवासाला प्राधान्य देतात. बेस्ट बसच्या सेवेतून प्रवाशांना कमी तिकीट दरात मोठं अंतर पार करता येतं. त्यामुळं बेस्टला मुंबईची दुसरी लाइफलाइन म्हणूनही ओळखलं जातं. मात्र, सध्या बेस्ट प्रवासावेळी वेळी प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे महिला प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्याव लागत आहे. त्यामुळं बेस्ट उपक्रमानं बसमध्ये प्रवेश करताना महिला प्रवाशांना प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आहे.

बेस्टच्या या निर्णयानुसार त्याची प्रायेगिक तत्वावर अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुसार, महिलांसाठी स्वतंत्र रांगा करण्यात येत आहेत. दक्षिण मुंबईत एका गर्दीच्या मार्गावर ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील आठवड्यात आणखी काही मार्गावर महिलांसाठी स्वतंत्र रांगा करण्यात येणार असल्याचं समजतं.

बेस्टमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून, सद्यस्थितीत २७ लाखांहून अधिक झाली आहे. यातून २ कोटी १५ लाख रुपये उत्पन्नही मिळू लागलं आहे. मुंबईत कोरोना निर्बंध शिथिल केल्यानंतर लोकल व बेस्ट प्रवासी संख्येत हळूहळू वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर बेस्टकडूनही प्रवाशांसाठी जादा बसगाड्या, फेऱ्या आणि अन्य नियोजन केलं जात आहे.

बेस्ट प्रवासात प्रवेश करताना होणारी गर्दी, धक्काबुकी इत्यादीमुळं महिला प्रवाशांची अडचण पाहता त्यांना बेस्ट बसमध्ये प्रवेशासाठी प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी स्वतंत्र रांगाही करण्यात येणार आहेत. त्याचा प्रयोग दक्षिण मुंबईतील एका मार्गिके वरही करण्यात आल्याची माहिती बेस्ट उपक्र माकडून देण्यात आली.

सीएसएमटी ते बॅकबे आगार (कुलाबा) दरम्यान १३८ क्रमांकाची बस धावते. सकाळी व सायंकाळी या बससाठी सुरुवातीच्या थांब्यापासून प्रचंड गर्दी असते. त्यात मोठ्या प्रमाणात महिलांचाही समावेश असतो. त्यामुळं या मार्गावर त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यात महिलांसाठी स्वतंत्र रांग करण्यात आली असून त्याच्या नियोजनासाठी बेस्ट कर्मचारीही तैनात करण्यात आला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा