Advertisement

मुंबईकरांनो, 'सी प्लेन'ची मजा लुटायला तयार रहा!

शनिवारी गिरगाव चौपाटीवर सी प्लेनची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यास पुढील वर्षांत मुंबईकरांसाठी सी प्लेन सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

मुंबईकरांनो, 'सी प्लेन'ची मजा लुटायला तयार रहा!
SHARES

मेट्रो झाली, मोनो झाली, मुंबई ते शिर्डी थेट विमानसेवाही सुरू झाली... मुंबईकरांनो, आता सी प्लेनची मजा लुटायला तयार व्हा! शनिवारी गिरगाव चौपाटीवर देशातल्या पहिल्यावहिल्या सी प्लेनची चाचणी घेण्यात आली. या विमानाची खासियत म्हणजे जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी या सी प्लेनचं लँडिंग करता येतं. ही चाचणी यशस्वी झाल्यास पुढील वर्षांत मुंबईकरांसाठी सी प्लेन सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या चाचणीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय विमान उड्डयनमंत्री राजू गजपती देखील उपस्थित होते.


सामान्यांना परवडणारं तिकीट

हे सी प्लेन जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी लँड होऊ शकेल. सी प्लेनमध्ये किमान १० ते १४ प्रवासी बसू शकतील. सामान्य माणसाला परवडेल इतकीच तिकीटाची किंमत ठेवण्याचा प्रयत्न असेल, असं यावेळी गडकरी यांनी सांगितलं. सुरूवातीच्या टप्प्यात ही सेवा मुंबई ते पुणे (लोणावळा) चालविण्याचा सरकारचा विचार असल्याचं कळत आहे.कनेक्टिव्हीटीत वाढ

चाचणी घेण्यात आलेलं सी प्लेन स्पाईट जेट विमान कंपनीचं होतं. अशी तब्बल १०० सी प्लेन सुरु करण्याचा स्पाईसजेटचा विचार आहे. सी प्लेनमुळे प्रादेशिक कनेक्टीव्हिटी वाढण्यास मदत होईल. एवढंच नव्हे, तर आपत्कालीन परिस्थितीतही या विमानाचा वापर करता येईल. विशेषकरून पर्यटन विकासालाही या सी प्लेन सुविधेचा फायदा होईल, असं स्पाईसजेटने म्हटलं आहे.तर, पुढच्या ३ महिन्यांतही सुरू

या कंपनीसोबत ही सेवा सुरू करण्याचा जलवाहतूक मंत्रालयाचा प्रयत्न आहे. याच सोबत इतर गुंतवणूकदारांनीही या उपक्रमात सहभाग घेतला, तर पुढील ३ महिन्यांत ही सेवा सुरू होऊ शकते, असंही गडकरी यांनी सांगितलं.

देशातील १११ नद्या, ७५०० किमी समुद्री किनाऱ्यांचा वापर जल वाहतुकीसाठी करण्याचा केंद्रीय जल वाहतूक मंत्रालयाचा प्रयत्न आहे. भारतातील लहान-मोठी शहरं, नदी, तलावांत हे सी प्लेन उतरवता येऊ शकतं. मुंबईत या सी प्लेनची सेवा कुठे सुरू होईल आणि त्याचा मार्ग कसा असेल, याची माहिती लवकरच केंद्रीय जलवाहतूक मंत्रालयाकडून देण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.या आधीही चाचणी

सी प्लेनची याआधी नागपूर आणि गुवाहाटी येथे देखील चाचणी करण्यात आली आहे. अशी जलवाहतूक सेवा सध्या युरोप, अमेरिका आणि कॅनडा सारख्या देशात सुरू आहे. ही सेवा कुठल्या नियमांतर्गत चालविण्यात येऊ शकते, त्याचा अभ्यास करून नवीन नियमावली बनवण्यात येईल, असंही यावेळी गडकरी यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement