Advertisement

कोकणच्या सर्व मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकिट मिळणार

कोकण रेल्वेचे विद्युतीकरण करण्यात आल्याने तिचा वेग आता वाढला आहे.

कोकणच्या सर्व मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकिट मिळणार
SHARES

कोकण रेल्वेचे विद्युतीकरण करण्यात आल्याने तिचा वेग आता वाढला आहे. त्यानंतर आता सर्व मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांमध्ये जनरल तिकिट मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही रिझर्वेशन शिवाय ऐनवेळी तिकीट काढूनही प्रवास करू शकणार आहात. प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा देणारा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या २९ जूनपासून हा निर्णय लागू होणार आहे. मध्य रेल्वेच्या सर्व मेल-एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांचे जनरल तिकीट आता सर्वत्र मिळणार आहे. यापूर्वी फक्त ठराविक रेल्वेचं जनरल म्हणजे रिझर्व्हेशन शिवाय मिळत होतं. पण आता रेल्वेच्या एटीव्हीएम, जीटीबीएस, अनारक्षित तिकीट काऊंटर व यूटीएस मोबाईल अॅपद्वारे हे जनरलचं तिकीट मिळणार आहे.

यामुळे आता वेटिंग लिस्ट असलेल्या आणि ऐनवेळी प्रवासाचं नियोजन करणाऱ्या प्रवाशांनासाठी हा मोठा दिलासा मिळाल्याने प्रवास आता अधिक सोपा होणार आहे.हेही वाचा

मुंबईत लवकरच धावणार एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बस

महालक्ष्मी रेसकोर्सनंतर मुंबईच्या ३५० बेस्ट बसस्थानकाचे होणार सुशोभीकरण

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा