Advertisement

मुंबईत लवकरच धावणार एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बस

मुंबईकरांची आवडती डबल डेकर बस आता इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस होणार आहे.

मुंबईत लवकरच धावणार एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बस
SHARES

मुंबईत लवकरच डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस सुरू होऊ शकतात. मुंबईतील पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात 7 ऑगस्ट रोजी बेस्टच्या स्थापना दिनानिमित्त लाँच होण्याची अपेक्षा आहे.

मुंबईची डबल डेकर बस देखील बॅटरीवर चालणार आहे. मुंबईकर आता इलेक्ट्रिक डबल डेकर बसमधून प्रवास करू शकतील. विशेष म्हणजे ही बस वातानूकुलित असेल.

एका अहवालानुसार, मुंबईतील डबल डेकर बसची संख्या 2019 मध्ये 120 वरून 2021 मध्ये केवळ 48 वर आली आहे. 

सरकारने यापूर्वीच 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बसेसना मान्यता दिली आहे. ज्यामध्ये या वर्षअखेरीस 225 बसेस धावताना दिसू शकतात. तसेच पुढील 225 बसेस मार्च 2023 मध्ये आणि उर्वरित 450 बसेस जून 2023 मध्ये मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसेल.

बेस्टच्या बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याची तयारी सुरू आहे. यासाठी राज्य सरकार 900 इलेक्ट्रिक बस खरेदी करत आहे. 2028 पर्यंत शहरात चालणाऱ्या सर्व डिझेल बसेस इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याची सरकारची योजना आहे.

राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री तसेच मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात म्हणाले होते की, शहरात १० हजार इलेक्ट्रिक बसेस आणण्याचं आमचं लक्ष्य आहे. त्यानंतर बेस्ट समितीनं ९०० एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस १२ वर्षांसाठी वेट लीजवर खरेदी करण्याच्या कराराला मंजुरी दिली होती. यातल्या बसेस पहिल्या टप्प्यात ऑगस्ट महिन्यात मुंबईत दाखल होतील.

राज्य सरकारचे म्हणणे आहे की, बेस्टच्या सर्व बस एकतर पूर्णपणे इलेक्ट्रिकवर धावतील किंवा त्या हायड्रोजन इंधन सेलवर चालवल्या जातील. कोणत्या माध्यमाने बसेस चालवणे अधिक सुरक्षित आणि कमी खर्चिक असेल हे यावर अवलंबून असेल.

इलेक्ट्रिक बसेस चार्ज करण्यासाठी 55 भागात चार्जिंग स्टेशन बांधले जात आहेत. हे चार्जिंग स्टेशन्स सार्वजनिक-खासगी भागीदारी अंतर्गत बांधली जात आहेत. येत्या 3-4 महिन्यांत मुंबईत अशी अनेक सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स तयार होतील. या स्थानकांवर लोक त्यांच्या इलेक्ट्रिक कार, बाईक किंवा स्कूटर देखील चार्ज करू शकतील.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा