जनता दरबार

 Goregaon
जनता दरबार
जनता दरबार
जनता दरबार
जनता दरबार
See all

गोरेगाव - गोकुळधामच्या लक्षचंडी हाईट्स इथं जनता दरबार भरवण्यात आला होता. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री रविंद्र वायकर, खासदार गजानन किर्तीकर, नगरसेवक जितेंद्र वळवी, पी दक्षिण विभागाचे पालिका सह आयुक्त एस. एस. धोंडे उपस्थित होते. नागरिकांनी वाहतूक कोंडी, रस्त्याचे रुंदीकरण, पार्किंग, फेरीवाले या संदर्भातील समस्या मांडल्या. तसेच रिंग रूट मार्गाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली. रिंग रूट मागणीचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती वाहतूक अधिकारी शिंदे यांनी दिली. तर फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सुचना वायकर यांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिल्या.

Loading Comments