मध्य रेल्वेवरील वाहतूक अर्धा तास उशीरा, ६० फेऱ्या रद्द

  Diva
  मध्य रेल्वेवरील वाहतूक अर्धा तास उशीरा, ६० फेऱ्या रद्द
  मुंबई  -  

  दिवा स्थानकाजवळ मालगाडीचा डबा घसरून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने ऐन गर्दीच्या वेळेस कामावरून घरी जाण्यास निघालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर ही घटना घडल्याने जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. आतापर्यंत मध्य रेल्वेवरील ६० फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून लोकल अर्धा तास उशीराने धावत आहेत.

  मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जलद मार्गावर दिवा स्थानकानजीक सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही मालगाडी घसरली. ही मालगाडी पारसिक बोगद्याअगोदरच घसरल्याने काही लोकल दिवा स्थानक ते पारसिक बोगद्यादरम्यान अडकल्या. यामुळे बऱ्याच प्रवाशांना लोकलमधून बाहेर पडून पायपीट करत दिवा स्थानक गाठलं.

  साधारणत: सव्वाआठ ते साडेआठच्या सुमारास हा घसरलेला डबा हटवण्यास मध्य रेल्वे प्रशासनाला यश आलं. परंतु या दरम्यान जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्याने त्याचा वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला आहे. बहुतेक लोकल अर्धा तास उशीरा धावत असल्याने सर्वच स्थानकांवर गर्दी झाली आहे. मुख्यत: घराकडे परतणाऱ्या चाकरमान्यांचे यामुळे हाल होत आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.