Advertisement

'इतक्या' रिक्षाचालकांना शासनाकडून १५०० रुपयांची मदत

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचा रिक्षा व्यवसायावर परिणाम झाला आहे.

'इतक्या' रिक्षाचालकांना शासनाकडून १५०० रुपयांची मदत
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचा रिक्षा व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्याचा विचार करून राज्यातील ७ लाख २० हजार परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रुपये या प्रमाणे १०८ कोटी रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

याबाबत गृह विभागानं नुकताच तसा शासन आदेश काढला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, राज्य सरकारनं निर्बंध लागू केले आहेत. त्याचा हातावर पोट असलेल्या कष्टकऱ्यांना व लहान व्यावसायिकांना फटका बसला आहे.

मात्र हे निर्बंध लागू करण्याआधीच कोरोनाप्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण होणाऱ्या घटकांना आर्थिक साहाय्य देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार याआधी राज्यातील पथविक्रेते व घरकाम करून आपले कुटुंब सांभाळणाऱ्या गृहसेविकांना प्रत्येकी १५०० रुपये याप्रमाणे मदत दिली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा