Advertisement

हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक १० मिनिटं उशिरा


हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक १० मिनिटं उशिरा
SHARES

मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागला. अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वेवरील वाहतूक ५ ते १० मिनिटं उशिरानं सुरू होती. तर ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूकही उशिरानं सुरू असल्याचं समजतं.

तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हार्बर रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. सध्या तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असल्याचीमाहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.

सध्या हार्बर मार्गावर नव्या मार्गिकेचं काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वेचे कर्मचारी सकाळपर्यंत हे काम करत असतात. त्यामुळे सकाळच्या वेळी गाड्या उशिरानं धावत असल्याचं बोललं जात आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा