शिवडी ते वडाळा रेल्वे स्थानकादरम्यान रूळाला तडा


  • शिवडी ते वडाळा रेल्वे स्थानकादरम्यान रूळाला तडा
  • शिवडी ते वडाळा रेल्वे स्थानकादरम्यान रूळाला तडा
SHARE

शिवडी - हार्बर मार्गावरील शिवडी ते वडाळा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने अप दिशेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता. पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर रेल्वे सेवा सुरळीत सुरु झाली. सकाळच्या वेळेला कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यांनी लोकलमधून उड्या मारुन रुळातून जाण्याचा मार्ग पत्करला. मात्र यादरम्यान वडाळा जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी खोळंबा झालेल्या प्रवाशांच्या त्रागाला नियंत्रणात ठेवण्याचे कार्य केले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या