मुसळधार पावसामुळे रस्ते तुडुंब, लोकल उशिराने

  Mumbai
  मुसळधार पावसामुळे रस्ते तुडुंब, लोकल उशिराने
  मुंबई  -  

  अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईला सोमवारी रात्रभर मुसळधार पावसाने झोडपले. मंगळवारी सकाळी देखील रिमझिम पाऊस सुरू होता. कुलाबा येथे मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत 56.8 मि. मी. पावसाची नोंद झाली. तर, सांताक्रूझमध्ये 12.8 मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली. पुढचे दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


  पावसामुळे लोकल गाड्या उशिराने

  मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक उशिराने धावत आहेत. कुर्ल्याजवळ सकाळी साडेसहावाजता अप स्लो लोकलमध्ये तांत्रिक बिघा़ड झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. वांद्रे आणि माहीमदरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गाड्या पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत आहेत.


  पावसामुळे या भागांत साचले पाणी

  मुंबई आणि उपनगरामध्ये रात्रभर पडलेल्या पावसामुळे सायन, हिंदमाता,  दादर, कांदिवली, किग्ज सर्कल या भागात पाणी तुंबल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. 


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.