Advertisement

युनिव्हर्सल पाससाठी नवी मुंबईत ११ रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष

लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस होऊन गेले आहेत अशा नागरिकांना मासिक सिझन पासवर प्रवास करण्याची परवानगी असणार आहे. अशा नागरिकांना त्यांच्या फोटोसह असलेला युनिव्हर्सल पास देण्यात येणार आहे.

युनिव्हर्सल पाससाठी नवी मुंबईत ११ रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष
SHARES

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना मुंबई महानगर प्रदेशातील लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा 15 ऑगस्टपासून देण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रमाण कार्यप्रणाली (SOP) जारी केली आहे.

लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस होऊन गेले आहेत अशा नागरिकांना मासिक सिझन पासवर प्रवास करण्याची परवानगी असणार आहे. अशा नागरिकांना त्यांच्या फोटोसह असलेला युनिव्हर्सल पास देण्यात येणार असून याव्दारे रेल्वे काऊन्टरवर मासिक सिझन पास घेता येणार आहे. त्यानंतर प्रवास करताना प्रवाशाने मासिक सिझन पाससोबत युनिव्हर्सल पासही सोबत ठेवणे आवश्यक आहे. स्तर 3 आणि त्यापेक्षा अधिक लेव्हल्स ऑफ रेस्ट्रिक्शन स्तराच्या मर्यादेत हा पास वापरता येईल.

या  कार्यप्रणालीनुसार दोन्ही डोस घेतल्यानंतर 14 दिवस झालेले आहेत हे तपासून प्रमाणित करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाला रेल्वे स्थानकांमध्ये विशेष मदत कक्ष स्थापन करण्याचे निर्देशीत करण्यात आले आहे. त्यानुसार  नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर, सीवूड, नेरुळ, जुईनगर, सानपाडा, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, राबाडे, ऐरोली या 11 रेल्वे स्टेशनवर  सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत विशेष मदत कक्ष कार्यान्वित असणार आहेत.

मासिक सिझन पास घेण्याची इच्छा असलेल्या पूर्णपणे लसीकरण झालेल्या म्हणजेच लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांनी आपल्या दोन कोव्हीड डोस घेतलेल्या प्रमाणपत्राची प्रत व आधार कार्डची प्रत घेऊन रेल्वे स्टेशनवरील महापालिकेच्या विशेष मदत कक्षाशी संपर्क साधावयाचा आहे. मदत कक्षावरील कर्मचारी लसीकरण प्रमाणपत्रावरील क्यू आर कोड स्कॅन करुन लसीकरणाची सत्यता पडताळतील व त्यावर विशेष शिक्का लावून लसीकरणाचे प्रमाणपत्र युनिव्हर्सल पाससाठी प्रमाणित करतील. ही मुद्रांकीत कागदपत्रे रेल्वे पास काऊन्टरवर दाखविल्यानंतर त्यांना मासिक सिझन पास देण्याबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल.

दर कार्यवाहीकरीता 11 रेल्वे स्टेशन्सवर तेथील तिकीट काऊन्टरची संख्या लक्षात घेऊन पालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांमार्फत विशेष मदत कक्ष 11 ऑगस्टपासून कार्यान्वित करण्यात येत आहेत. संबंधित विभाग कार्यालयांचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी हेच या कार्यवाहीचे विभागीय नोडल अधिकारी असणार असून महापालिका आयुक्त यांचे निर्देशानुसार प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार याचे मुख्य नियंत्रक अधिकारी असणार आहेत.

 या विशेष मदत कक्षावरील कार्यवाहीकरीता सकाळी 7 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 ते रात्री 11 अशा दोन सत्रात 100 हून अधिक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय लवकरच युनिव्हर्सल पास देणेबाबत ऑनलाईन ॲपदेखील शासनाच्या वतीने कार्यान्वित करण्यात येत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा