Advertisement

HOG सिस्टीममुळं मध्य रेल्वेच्या डिझेलवरील खर्चात 'इतकी' बचत

मध्य रेल्वेने एचओजी पॉवर सप्लाय सिस्टीमचा अवलंब करून डिझेलवरील खर्चात ८७.७७ कोटी रुपयांची बचत केली आहे.

HOG सिस्टीममुळं मध्य रेल्वेच्या डिझेलवरील खर्चात 'इतकी' बचत
SHARES

मध्य रेल्वेने एचओजी पॉवर सप्लाय सिस्टीमचा अवलंब करून डिझेलवरील खर्चात ८७.७७ कोटी रुपयांची बचत केली आहे. मध्य रेल्वेने चालू वर्षात एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हेड ऑन जनरेशन (एचओजी) वीजपुरवठा प्रणाली अवलंबून डिझेलवरील खर्चात ८७.७७ कोटी रुपयांची निव्वळ बचत केली आहे.

पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोल सिस्टीम आणि पॉवर सप्लाय सिस्टीमच्या क्षेत्रातील तांत्रिक सुधारणा आणि सतत प्रगतीसह, भारतीय रेल्वेने सध्या मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी हेड ऑन जनरेशन म्हणून परिचित असलेल्या डब्यांना वीज पुरवठ्यासाठी ऊर्जा कार्यक्षम वीज पुरवठा प्रणाली अवलंबण्याचा निर्णय घेतला. सध्या 'एंड ऑन जनरेशन' (ईओजी) प्रणाली चालू आहे.

एचओजी तंत्रज्ञानामध्ये, 3-फेज इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हमधून वीज पुरवली जाते जी पॅन्टोग्राफद्वारे थेट इलेक्ट्रिक ट्रॅक्शनमधून पॉवर काढून मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या डब्यातील  एअर कंडिशनर, इलेक्ट्रिक बल्ब पंखे आणि पॅन्ट्री इ. वीज पुरवठा आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वापरला जाते.

एचओजी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी एलएचबी प्रकारचे कोच सर्वात योग्य आहेत.  आजपर्यंत मध्य रेल्वेकडे १६६५ एलएचबी कोचसह ७५ एलएचबी रेक आहेत आणि ते सर्व एचओजी अनुरूप आहेत.  याद्वारे मध्य रेल्वेने चालू वर्षात एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२  या कालावधीत डिझेलच्या वापरावरील खर्चामुळे ८७.७७ कोटी रुपयांची बचत केली आहे.

HOG तंत्रज्ञानाचे फायदे

  • पॉवर कारमधील डिझेलचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने मोठी आर्थिक बचत.
  • वायू प्रदूषणात घट
  • जनरेटर कार काढून टाकल्यामुळे ध्वनी प्रदूषणात घट
  • पॉवर कारच्या जागी प्रवासी कोच जोडून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे प्रवासी उत्पन्नात वाढ होईल.
  • कार्बन क्रेडिट्स मिळतात- वातावरणात हाय स्पीड डिझेल जाळून कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित न करून कार्बन क्रेडिट्स मिळवता येतात.
  • जनरेटिंग उपकरणांची कमी संख्या, कमी देखभाल इत्यादीमुळे चांगली विश्वासार्हता राहते. 
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा