Advertisement

विमानात एकटा बसून दुबईत गेला तरुण, खरेदी केलं १८ हजाराचं तिकिट

त्यांच्यासाठी हा अनुभव कोणत्याही चार्टड फ्लाइटपेक्षा कमी नव्हता.

विमानात एकटा बसून दुबईत गेला तरुण, खरेदी केलं १८ हजाराचं तिकिट
SHARES

मुंबईत राहणाऱ्या भावेश जावेरी यांचा १९ मे रोजीचा दुबईपर्यंतचा विमान प्रवास अविस्मरणीय ठरला आहे. ते बोइंग ७७७ प्लेननं १८ हजार रुपयांत तिकीट बुक करून दुबईत गेले होते.

३६० सीटच्या संपूर्ण प्लेनमध्ये एकटे होते. त्यांच्यासाठी हा अनुभव कोणत्याही चार्टड फ्लाइटपेक्षा कमी नव्हता. त्यांनी एंट्री करताच एअर होस्टेजेज आणि कॅप्टननं त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केलं.

४० वर्षांचे भावेश जावेरी स्टारजेम्स ग्रुपचे CEO आहेत. दुबईमध्येही त्यांच्या कंपनीचे ऑफिस आहे. ते अनेक वेळा फ्लाइंट्सनं मुंबईहून दुबईला गेले आहेत. मात्र यावेळचा प्रवास त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. भावेश यांनी सांगितलं की, कामासाठी त्यांनी एअरलाइन्स एमिरेट्सला कॉल करून एक आठवड्यापूर्वी दुबईचे तिकीट बुक केलं होतं. याची किंमत १८ हजार रुपये होती.

जावेरी यांनी सांगितलं की, ते सामान्यतः बिझनेस क्लासमध्ये जातात. मात्र यावेळी त्यांनी इकॉनॉमी क्लासचे तिकीट घेतलं होतं. त्यांच्या फ्लाइटची वेळ ४.३० होती. ते फ्लाइटमध्ये बसले तेव्हा हे पाहून चकीत झाले की, विमानात क्रू मेंबर आणि त्यांच्याशिवाय कोणताच प्रवासी नव्हता.

या अडीच तासांच्या फ्लाइटसाठी बोइंग ७७७ विमानात ८ लाखांचं इंधन लागतं. अशा वेळी केवळ एका प्रवासाला घेऊन मुंबईहून दुबईला जाण्याचा एमिरेट्सचा निर्णय हा हटके होता.

एका भारतीय अधिकाऱ्यानं सांगितलं की, असे तेव्हाच शक्य होते जेव्हा विमान जास्ती जास्त प्रवाशांना घेऊन दुबईहून मुंबईत आलं असेल आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत दुबईत परतायचं असेल.

अशा वेळी एअरलाइन्सनं त्याच फ्लाइटमध्ये भावेश यांना तिकीट दिलं असेल. तसा मुंबईहून दुबई रुटवर एका चार्टर्ड फ्लाइटचे भाडे ७० लाख रुपये असते.Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा