Advertisement

जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास कसा मिळवायचा?

ई-पाससाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवर अर्ज केल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आल्यानंतर टोकन क्रमांक नोंदवून ई-पास पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करा. आणि प्रिंट आऊट काढून ठेवा.

जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास कसा मिळवायचा?
SHARES

ई-पास कसा काढायचा?

 • ई-पास काढण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटला भेट द्या. 
 • त्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या सूचना वाचून घ्या. 
 • सूचना वाचून झाल्यानंतर तुम्ही ई-पास साठी अर्ज करा या बटनावर क्लिक करा आणि पुढे जा. 
 • महाराष्ट्राबाहेर जायचं आहे की नाही यावर क्लिक करा.

ई-पास कसा मिळवण्यासठी सोप्या टिप्स

 • जिल्हा किंवा पोलीस आयुक्तालय निवडा.
 • तुमचे संपूर् नाव नोंद करा.
 • प्रवास कोणत्या तारखेपासून ते किती तारखेपर्यंत करणार ते नमूद करा.
 • मोबाईल नंबर आणि प्रवासाचे कारण आणि प्रवासाचा उद्देश सविस्तर पणे नोंद करा.
 • वाहनाचा प्रकार, वाहनाचा नोंदणी क्रमांक, सध्याचा पत्ता आणि ई-मेल नोंद करा.
 • प्रवास जिथून करणार ते ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या नमूद करा.
 • आपण कटेंन्टमेंट झोनमधील आहात का? याविषयी माहिती सादर करा.
 • परतीचा प्रवास याच मार्गानं करणार का हे नमूद करा.
 • २०० केबी पेक्षा लहान साईजचा फोटो अपलोड करा आणि सर्व माहिती चेक करुन अर्ज सादर करा.

ई-पाससाठी अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या बाबी

 • राज्य आणि केंद्र सरकारच्या यादीतील अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाऱ्यांना आंतर जिल्हा आणि आंतरराज्य प्रवासासाठी ई-पास आवश्यक नाही. 
 • ई-पास मंजूर करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाचे उपायुक्त यांच्याकडे असेल. 
 • वैयक्तिक किंवा व्यक्तींचा समूह अर्ज करु शकतो. 
 • सर्व आवश्यक कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करा. 
 • अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला टोकन आयडी मिळेल. 
 • टोकन क्रमांक सेव्ह करुन ठेवा. ई-पास अर्ज मंजूर झाल्यानंतर टोकन आयडीद्वारे तो डाऊनलोड करुन ठेवा. 
 • ई-पास डिजीटल आणि प्रिंट स्वरुपात प्रवासादरम्यान सोबत ठेवा. 
 • ईपासचा गैरवापर करणे कायद्याप्रमाणं गुन्हा आहे हे लक्षात ठेवा.

ई-पास डाऊनलोड कसा कराल?

ई-पाससाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवर अर्ज केल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आल्यानंतर टोकन क्रमांक नोंदवून ई-पास पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करा. आणि प्रिंट आऊट काढून ठेवा.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा