Advertisement

रेल्वेने रद्द केल्या 524 ट्रेन

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून भारतीय रेल्वेने एकूण 524 ट्रेन रद्द केल्या आहेत.

रेल्वेने रद्द केल्या 524 ट्रेन
SHARES

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून भारतीय रेल्वेने एकूण 524 ट्रेन रद्द केल्या आहेत. रद्द झालेल्या मध्ये एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेन्स तसंच काही स्पेशल रेल्वेसेवांचा समावेश आहे.

मागील 2 दिवसांपासून रेल्वेने अनेक ट्रेन रद्द केल्या. 19 मार्च रोजीही अनेक रेल्वे रद्द केल्या आहेत. यामध्ये जनशताब्दी, सुपरफास्ट ट्रेन, मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर अशा ट्रेन्सचा समावेश आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. त्यामुळे अनेकांनी प्रवास करणं टाळलं आहे.प्रवाशांची कमी झालेली संख्या आणि खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय रेल्वेने बुधवारपर्यंत 80 रेल्वेगाड्या रद्द केल्या होत्या. हजरत निजामुद्दीन ते छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस राजधानी एक्सप्रेस आणि छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसचाही यामध्ये समावेश आहे.

 भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन रद्द झालेल्या गाड्यांबाबत माहिती मिळेल. त्याचप्रमाणे प्रत्येक स्टेशनवर रद्द झालेल्या गाड्यांबाबत आवश्यक तेव्हा अनाउन्समेंट करण्यात येत आहे. प्रवासी 139 या क्रमांकावर मेसेज करून देखील रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांबद्दल माहिती घेऊ शकतात. रिझर्व्हेशन केले असेल आणि ती गाडी जर रद्द झाली तर प्रवाशांना त्याचा पूर्ण रिफंड मिळणार आहे. त्यामुळे जर तुमची गाडी रद्द झाली असेल तर इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी तुम्ही दुसऱ्या ट्रेनचं बुकिंग करू शकता.



हेही वाचा -

Coronavirus Updates: पश्चिम रेल्वेची एसी लोकल बंद

Coronavirus : क्वारंटाईनचा सल्ला दुर्लक्षित करून चौघा तरूणांचा ट्रेनमधून प्रवास



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा