भारतीय रेल्वे लवकरच मुंबईहून पाच अमृत भारत ट्रेन सुरू करणार आहे. यापैकी चार लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून सुटतील. तर एक वांद्रे टर्मिनस येथून चालेल. या ट्रेन मुंबईला समस्तीपूर जंक्शन, वाराणसी, सीतामढी, भागलपूर आणि गोरखपूर या प्रमुख स्थळांशी जोडेल.
रेल्वे बोर्डाच्या पत्रानुसार, या अमृत भारत गाड्या चालवणे हा देशभरातील 26 मार्गांवर कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या व्यापक उपक्रमाचा एक भाग आहे. "सर्व संबंधित क्षेत्रीय रेल्वेंना या सेवांसाठी 16 नोव्हेंबर 2024 पर्यंत वेळापत्रक तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत" एका अधिकाऱ्याने सांगितले की, या गाड्या मार्च 2025 पर्यंत सेवा (कार्यरत) सुरू होतील.
उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशा यांसारख्या प्रमुख राज्यांसह तसेच प्रमुख महानगर क्षेत्रांशी कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. अमृत भारत ट्रेनमध्ये 12 स्लीपर कोच आणि आठ सामान्य डबे असतील, ज्यामध्ये अपंग प्रवाशांसाठी सुविधा असतील, एकूण 1,834 प्रवासी बसतील.
सीसीटीव्ही कॅमेरे, अपंग प्रवेशासाठी रॅम्प, फोल्डिंग स्नॅक टेबल आणि अपंग व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे यासारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या गाड्या 130 किमी/तास वेगाने धावतील. अधिका-यांना अपेक्षा आहे की, अमृत भारत गाड्या सुरू केल्याने सध्याच्या सेवांवरील प्रचंड मागणी कमी होईल. विशेषत: गर्दीच्या वेळेत प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होतील.
हेही वाचा