Advertisement

मुंबई-अहमदाबाद इंडिगो विमानाचा टायर फुटला, प्रवासी सुखरूप


मुंबई-अहमदाबाद इंडिगो विमानाचा टायर फुटला, प्रवासी सुखरूप
SHARES

मुंबई विमानतळावरून अहमदाबादसाठी उड्डाण घेतलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचा टायर अचानक फुटला. त्यामुळे या विमानाचं अहमदाबाद विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. दरम्यान विमानाच्या लँडिंगसाठी अहमदाबाद विमानतळावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळी या विमानात 185 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे.


इतर विमानं रखडली

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेत असताना 6E361, A320 मुंबई-अहमदाबाद विमानाचा टायर फुटला. मात्र ही बाब वैमानिकाच्या लक्षात आली. त्याने तातडीने अहमदाबादच्या एअर ट्राफिक कंट्रोल रूमला कळवत इमर्जन्सी लँडिंगची विनंती केली.

वैमानिकाची विनंतर मान्य केल्यानंतरअखेर बुधवारी संध्याकाळी 7.21 वाजता त्या विमानाचं अहमदाबाद विमानतळावर लँडिंग करण्यात आलं. त्यानंतर निरीक्षण करून या विमानाचं टायर बदलण्यात आलं. मात्र हे विमान रखडल्यामुळे काही काळापर्यंत इतर विमानांचा खोळंबा झाला होता.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा