Advertisement

शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटी बसच्या पासची सुविधा सुरू करण्याच्या सूचना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या शाळा आता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटी बसच्या पासची सुविधा सुरू करण्याच्या सूचना
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या शाळा आता पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, राज्य सरकारनं २७ जानेवारीपासून ५ वी ते ८ वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं राज्यभरात गावातून शहरापर्यंत एसटीनं प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी बसच्या पासची सुविधा सुरू करण्याच्या सूचना राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारनं १८ जानेवारीपासून शाळांमध्ये कोव्हिड प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजना करून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता ५ वी ते ८ वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी ग्रामीण भागातून शहरातील शाळांत एसटीनं प्रवास करतात. त्यामुळं शालेय पासची मोठ्या प्रमाणावर मागणी होणार असल्यानं एसटी महामंडळानं आपली तयारी सुरू केली आहे.

एसटीच्या आगर व्यवस्थापकांच्या अखत्यारीत असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांना भेटून पासेसची गरज असलेल्या विद्यार्थ्यांची नोंद करायची आहे. शिवाय शालेय संस्थेत जाऊन पासेस वितरित करण्यात यावेत. शिवाय पूर्वी चालनात असलेल्या सर्व शालेय फेऱ्या सुरू करण्यात याव्यात. नव्यानं फेऱ्या सुरू करण्याची आवश्‍यकता असल्यास तत्काळ शालेय फेरी सुरू करण्याचं आदेशसुद्धा एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिली आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा