Advertisement

मेट्रोचा पिलर बेस्टवर कोसळला, सुदैवाने कुणालाही दुखापत नाही


मेट्रोचा पिलर बेस्टवर कोसळला, सुदैवाने कुणालाही दुखापत नाही
SHARES

मुंबईच्या अनेक भागात सद्यस्थितीत मेट्रो प्रकल्पाची कामं सुरु आहेत. या कामांसाठी काही ठिकाणी रस्त्यावर खोदकाम करण्यात आलं आहे. तर काही ठिकाणी मेट्रोचा पूल उभारणीसाठी लोखंडाचे मोठमोठे खांब उभारण्यात आले आहे. असाच एक भला मोठा लोखंडी खांब बेस्ट बसवर पडून गुरुवारी सकाळी अपघात झाला. सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.


कधी घडला अपघात?

कांदिवली पूर्वेकडील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात महिंद्रा सिग्नलजवळ गुरूवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बेस्ट उपक्रमाची ७१८ बस दिंडोशीवरून भाईंदरकडे जात होती, तेव्हाच मेट्रो पूलचा पिलर बनवण्याचा लोखंडी सळ्यांचा साचा या बसवर पडला.


दिंडोशीवरुन भायंदरला जाणारी ७१८ ची ही बस होती. ठाकूर कॉम्प्लेक्स जवळील महिंद्रा सिग्नलवर असताना हा अपघात झाला. त्यावेळी बसमध्ये प्रवासी बसले होते. पण त्यापैकी कुणालाही इजा झाली नाही. अपघातात केवळ बसच्या वरील भागाचा पत्रा डॅमेज झाला आहे.
- हनुमंत गोफणे, जनसंपर्क अधिकारी, बेस्ट



हेही वाचा-

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांकडून वेगमर्यादेचं उल्लंघन; १३ हजारांचा दंडही बाकी

बेस्टचा तोटा १८०० कोटींवर



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा