Advertisement

बिदर-मुंबई एक्स्प्रेस 1 जुलैपासून धावणार


बिदर-मुंबई एक्स्प्रेस 1 जुलैपासून धावणार
SHARES

लातूर एक्स्प्रेस ट्रेन केवळ लातूरपर्यंतच चालवण्यात यावी, अशी लातूरकरांची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अमान्य केलीय. याच जोडीला रेल्वे मंत्रालयाने 1 जुलैपासून बिदर-मुंबई या एक्स्प्रेसला मंजुरी दिलीय. ही एक्स्प्रेस दररोज धावणार असून पूर्वी ती आठवड्यातून केवळ तीन दिवसच धावत होती.

सध्याची लातूर-मुंबई एक्स्प्रेस ही ट्रेन केवळ लातूरपर्यंतच ठेवावी, ती बिदरपर्यंत वाढवू नये, अशी लातूरकरांची मागणी होती. बिदरपासून रेल्वे सोडल्यास या रेल्वेत लातूरकरांना बसायला जागाच मिळणार नसल्याने प्रवाशांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे लातूरकरांचे म्हणणे आहे.

याप्रश्नी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी थेट दिल्ली गाठत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेत त्यांनी सध्याची लातूर-मुंबई एक्स्प्रेस ही ट्रेन बिदरऐवजी परळीपर्यंत विस्तारीत करण्यात यावी. या रेल्वे शिवाय परळीतून आणखी एक स्वतंत्र रेल्वे सुरु करावी व परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाचे काम नगरप्रमाणे परळीच्या बाजूनेही सुरु करावे, अशी मागणी केली. त्यांच्या परळी-बीड-नगर मार्गाच्या मागणीला मंजुरी मिळाली असली, तरी दुसरी मागणी अमान्य करण्यात आलीय.

लातूरची ट्रेन बिदरला पळवली, असा सध्या सर्वत्र प्रचार करण्यात येतोय. त्याला उत्तर म्हणून यशवंतपूरहून बिदरला येणारी ट्रेन जिचा थांबा बिदरलाच असायचा ती ट्रेन आता लातूरपर्यंत वाढवली जाणार आहे. तीन आठवड्यात ही रेल्वे सेवा सुरू होणार आहे. ही रेल्वे दररोज धावणार असून लातूर, उस्मानाबाद आणि बिदर या तिन्ही भागांना त्यात समान कोटा असणार आहे. तसेच यशवंतपूर ते बिदरपर्यंत धावणारी रेल्वे लातूरपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा