Advertisement

कल्याण-कर्जत मार्गावरील लोकल वाहतूक पूर्वपदावर


कल्याण-कर्जत मार्गावरील लोकल वाहतूक पूर्वपदावर
SHARES

कल्याण-कर्जत मार्गावरील वांगणी आणि शेलू या दोन स्थानकांदरम्यान सकाळी रेल्वे रुळाला तडा गेल्याने लोकल वाहतूक १० वाजेच्या सुमारास विस्कळीत झाली होती. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने तात्काळ रूळाची दुरूस्ती केल्याने तासाभरात वाहतूक पूर्वपदावर आली आहे. परंतु या वाहतूक खोळंब्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी कुटुंबासह नातेवाईकांकडे जाण्यास निघालेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

भाऊबीजेनिमित्त सध्या पश्चिम, मध्य आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. त्यातच सर्वाधिक गर्दीच्या मध्य रेल्वे मार्गावरील वांगणी आणि शेलू स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेल्याने लोकलसेवा बदलापूरपर्यंतच सुरू होती. त्याचा फटका मध्य मार्गावरील लोकलसेवेसह लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही बसला.

पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांनाही या बिघाडामुळे एकामागोमाग एक उभे करून ठेवण्यात आले. त्यामुळे मुंबईबाहेर पुण्याच्या दिशेने निघालेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. अखेर ११ वाजून ५ मिनिटांनी रूळ दुरुस्त झाल्यानंतर कल्याण-कर्जत आणि पुढे पुण्यापर्यंतची वाहतूक सुरळीत सुरू झाली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा