Advertisement

अंबरनाथ येथे लोकल रुळावरून घसरली, लोकल सेवा विस्कळीत

लोकलचे चाक रुळावर आणण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

अंबरनाथ येथे लोकल रुळावरून घसरली, लोकल सेवा विस्कळीत
SHARES

रविवार सकाळी अंबरनाथ येथे डाऊन दिशेकडे जाणाऱ्या लोकलचा एक डबा रुळावरून घसरला. परिणामी कल्याण-कर्जत दिशेकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

तर, डाऊन कल्याण ते बदलापूर विभागात ब्लॉक घेण्यात आला असून अप दिशेकडील कर्जत-कल्याण विभाग सुरू आहे.

दरम्यान, लोकल रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

रविवारी सकाळी ८.२५ वाजता अंबरनाथ येथे रिकाम्या लोकलच्या एका डब्याचे एक चाक साइडिंगमध्ये रुळावरून घसरले.

घटनेची माहिती संबंधित रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळताच, घटनास्थळी कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यानंतर लोकलचे चाक रुळावर आणण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या घटनेमुळे कल्याण ते कर्जत दरम्यानच्या लोकल सेवेचे वेळापत्रक बिघडले आहे.

तसेच डाऊन एलटीटी – विशाखापट्टणमला अंबरनाथ येथे थांबून ठेवले आहे. तसेच एक डाऊन बदलापूर आणि अंबरनाथ लोकलला उल्हासनगर येथे थांबविले आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा