Advertisement

कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन होणार

महाराष्ट्र सरकारने गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना लिहिलेल्या पत्राद्वारे मंजुरी दिली.

कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन होणार
SHARES

कोकण रेल्वेचे (kokan railway) भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण (merged) करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र (maharashtra) सरकारने गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (ashwini vaishnav) यांना लिहिलेल्या पत्राद्वारे मंजुरी दिली.

या विलीनीकरणाला यापूर्वी कर्नाटक, गोवा आणि केरळ सरकारनेही मान्यता दिली आहे. या विलीनीकरणाचा उद्देश कोकण रेल्वेच्या आर्थिक अडचणी दूर करणे, कार्यक्षमतेत वाढ करणे आणि पायाभूत सुविधा सक्षम करणे आहे.

महाराष्ट्राने दोन अटींसोबत विलीनीकरणासाठी आपली संमती दिली. विलीनीकरणानंतरही भारतीय रेल्वे कोकण रेल्वे हे नाव कायम ठेवेल आणि 1990 मध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) ची स्थापना करताना महाराष्ट्र सरकारने दिलेल्या 394 कोटींपेक्षा जास्त रकमेची परतफेड करेल. 

केआरसीएल हा रेल्वे मंत्रालय आणि चार राज्यांच्या मालकीचा संयुक्त उपक्रम आहे. यात केेंद्र सरकारने 51 टक्के,  महाराष्ट्राने 22 %, कर्नाटक राज्याने 15%, गोवा आणि केरळ राज्याने प्रत्येकी 6% निधी कोकण रेल्वेच्या निर्मितीत गुंतवला आहे.

"कोकण रेल्वेची स्वतंत्र कंपनी म्हणून क्षमता मर्यादित असल्याने आणि तिच्या पायाभूत सुविधांच्या गरजा खूप जास्त असल्याने भारतीय रेल्वेच्या गुंतवणूकीतून कोकण रेल्वेला वाटा मिळणे महत्त्वाचे होते," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले.

"यामुळे प्रवाशांची सुरक्षा आणि इतर सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होईल. कोकण रेल्वेच्या विस्तारात आणखी मदत होईल, ज्यामध्ये अधिक रेल्वे मार्ग जोडणे, नेटवर्क वाढवणे आणि या मार्गावर अतिरिक्त सेवा सुरू करणे समाविष्ट आहे," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, कोकण रेल्वेला त्यांच्या मर्यादित उत्पन्नाच्या स्रोतामुळे त्यांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यात किंवा वाढत्या मागण्या पूर्ण करण्यात अपयश येत आहे.

"या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे," असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, रेल्वे मंत्रालयाने कोकण रेल्वेचे नाव बदलणार नाही यावर सहमती दर्शवली आहे. "सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती कोकण रेल्वे म्हणून ओळखली जाईल," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोकण रेल्वे ही महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ यांना जोडणारी 741 किलोमीटर लांबीची निसर्गरम्य रेल्वे मार्गिका आहे. ती नद्या, दऱ्या आणि ढगांमध्ये भरकटणारे पर्वत यातून जाते.

कोकण रेल्वेवरील पहिली प्रवासी रेल्वे 20 मार्च 1993 रोजी उडुपी आणि मंगलोर दरम्यान धावली. भारतीय रेल्वे अनेक प्रवासी गाड्या चालवण्यासाठी देखील या मार्गाचा वापर करते.



हेही वाचा

"इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ" स्थापन करण्याचा उपक्रम

कल्याणमधील स्लॅब कोसळल्याने एका व्यक्तीला अटक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा