Advertisement

कार्यालयात ५० टक्के उपस्थितीचे आदेश देण्याची रेल्वे प्रवासी संघटनांची मागणी

रुग्णसंख्येत गेल्या आठवड्याभरापासून वाढ होत असून मुंबई उपनगरीय रेल्वेवरील वाढत्या गर्दीबाबत राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाही.

कार्यालयात ५० टक्के उपस्थितीचे आदेश देण्याची रेल्वे प्रवासी संघटनांची मागणी
SHARES

ऑमिक्रॉन आणि कोरोनाच्या संसर्गाचा वाढता वेग पाहता सरकारी, खासगी कार्यालयीन उपस्थिती ५० टक्के करावी आणि अर्थचक्र न थांबता लोकल प्रवासासाठी वेळेची मर्यादा आणण्याची मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. रुग्णसंख्येत गेल्या आठवड्याभरापासून वाढ होत असून मुंबई उपनगरीय रेल्वेवरील वाढत्या गर्दीबाबत राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाही.

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरील लोकल गाड्यांना प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. यापूर्वीही उशिराने वेगवेगळे निर्णय घेतल्यामुळे बराच गोंधळ उडाला होता. आता लोकलमधील गर्दीवर नियंत्रणासाठी कार्यालयीन उपस्थिती ५० टक्के करण्याचे आदेश त्वरित काढावे, ही प्रवासी संघटनांची मागणी आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर दररोज सरासरी २५ लाख ५८ हजार १५८ प्रवासी प्रवास करत होते. नोव्हेंबरमध्ये हीच संख्या सरासरी २३ लाख २० हजार होती. शनिवार १ जानेवारी २०२२ ला सध्या २२ लाख ३८ हजार असून ३ जानेवारीला मात्र ४१ लाख ४५ हजार असल्याची नोंद झाली आहे.

पश्चिम रेल्वेकडूनही दररोजची उपनगरीय प्रवासी संख्येची माहिती दिली असता, नोव्हेंबर २०२१ मध्ये सरासरी १९ लाख १० हजार असलेली प्रवासी संख्या डिसेंबर २०२१ मध्ये २० लाख २१ हजार ६१५ झाली. जानेवारीत सध्या २१ लाख ७३ हजार प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात आले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा