Advertisement

ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात महत्त्वाचा निर्णय

राज्यातील ५० आरटीओ कार्यालयात दररोज सरासरी १.५ लाख नागरिकांची गर्दी होते.

ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात महत्त्वाचा निर्णय
SHARES

वाहनासंबधी कागदपत्रांसाठी नागरिकांना दररोज आरटीओ कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. राज्यातील ५० आरटीओ कार्यालयात दररोज सरासरी १.५ लाख नागरिकांची गर्दी होते. हे लक्षात घेऊन आधार लिंक वाहन परवान्याच्या सुविधेमुळं आरटीओ कार्यालयातील गर्दी कमी होण्यास मदत होईल असा आशावाद परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केला आहे.

केंद्र सरकारनं यापुर्वीच आधार लिंक संदर्भातील एक अधिसुचना जारी केली आहे. यामध्ये वाहन नोंदणी आणि वाहन परवान्यासंबधीचे कागदपत्रं आधार कार्डशी जोडले जातील. त्यामुळं आरटीओ कार्यालयात येऊन कागदपत्रं जमा करण्यापासून लोकांना मुक्ती मिळेल आणि कार्यालयातील दररोजची २० गर्दी कमी होण्यास मदत होईल असंही परिवहन आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. या निर्णयामुळे दलालांची साखळी तोडता येणं शक्य होणार आहे.

आधार लिंकीगमुळं परवान्याचे डुप्लीकेशन करण्याला आपोआप आळा बसेल. ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यालाठी दलाल तगडी रक्कम वसून करतात. या दलालांवर चाप बसेल आणि सर्वसामान्य नागरिकांना चांगली सेवा देता येईल असा आशावाद परिवहन आयुक्तांनी व्यक्त केला.

परिवहन विभागानं शिकाऊ ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डिझीटल स्वाक्षरी अनिवार्य केली आहे. त्याची कालयर्यादा सहा महिन्याची राहणार आहे. अशा डिझीटल स्वाक्षरी केलेल्या शिकाऊ ड्रायव्हिंग लायसंन्ससाठी आतापर्यंत ७०० अर्ज आल्याचेही परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा