Advertisement

जोगेश्वरी-अंधेरीदरम्यान लोकलकोंडीने वाहतूक विस्कळीत

गुरुवारी सकाळी जाेगेश्वरी आणि अंधेरी स्थानका दरम्यान धावणारी जलद लोकल ट्रेन तांत्रिक बिघाडाने थांबल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. ही लोकल सुरू होण्याचं नावच घेत नसल्याने अखेर प्रवाशांनी रेल्वे रुळावरून चालत स्थानक गाठलं. या लोकलकोंडीमुळे पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत.

जोगेश्वरी-अंधेरीदरम्यान लोकलकोंडीने वाहतूक विस्कळीत
SHARES

पश्चिम रेल्वेच्या मागचं शुक्लकाष्ठ संपण्याचं नावच घेत नाही. रोज कुठल्या ना कुठल्या कारणानं पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील लोकल गाड्या उशिरानं धावताना दिसत आहेत. त्यातच गुरुवारी सकाळी जलद मार्गावरून चर्चगेटला निघालेली लोकल ट्रेन जाेगेश्वरी आणि अंधेरी स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाडाने थांबल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. ही लोकल सुरू होण्याचं नावच घेत नसल्याने अखेर प्रवाशांनी रेल्वे रुळावरून चालत स्थानक गाठलं. या लोकलकोंडीमुळे पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. 


सर्व फास्ट ट्रेन स्लो मार्गावरुन

सकाळी ११.०८ वाजताची विरार-चर्चगेट जलद लोकल अंधेरी स्थानकापासून ५ मिनिटे आधीच तांत्रिक बिघाडाने थांबली. अंधेरी ते विलेपार्ले स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चर्चगेट -बोरीवली फास्ट लोकल स्लो मार्गावरून वळवल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली.

२० ते २५ मिनिटानंतर ही लोकल सेवा पूर्ववत झाली असून या बिघाडामुळे पश्चिम रेल्वेच्या जलद लोकलच्या वेळापत्रकावर चांगलाच परीणाम झाला. सध्या पश्चिम रेल्वेवरील लोकल सरासरी १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. तर काही लोकल २५ ते ३० मिनिटे उशीराने येत असल्याची तक्रार प्रवाशांनी नोंदवली आहे.हेही वाचा-

एल्फिन्स्टन झालं प्रभादेवी!

खार सबवेचा भाग कोसळल्याची अफवा, परेची वाहतूक विस्कळीतRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा