Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

एल्फिन्स्टन झालं प्रभादेवी!


एल्फिन्स्टन झालं प्रभादेवी!
SHARES

पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड स्टेशन आता इतिहासजमा झाला आहे. कारण या स्टेशनचं नामांतर अखेर प्रभादेवी असं करण्यात आलं असून बुधवारी रात्री रेल्वे प्रशासनाने स्टेशनवरील एल्फिन्स्टन नावाचे फलक काढून प्रभादेवी फलकाचं अनावरण केलं. दरम्यान बुधवारी मध्यरात्री शोभायात्रा काढत हा नामांतर सोहळा पार पडला.


अशी मिळाली मंजुरी

सीएसटी या स्टेशनच्या नावात महाराज या शब्दाचा समावेश करण्याची मागणी लोकप्रतीनिधींनी केल्यानंतर केंद्र सरकारकडून जून २०१७ मध्ये अधिसूचना काढण्यात आली. त्यानंतर सीएसटी छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्टेशनचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं करण्यात आलं. यानंतर एल्फिन्स्टन रोड स्टेशनला प्रभादेवी नाव देण्याची मागणी जोर धरू लागली. त्यामुळे पश्चिम रेल्वेने एल्फिन्स्टन स्टेशनचं नाव प्रभादेवी करण्याच्या मंजुरीचा प्रस्ताव रेल्वेकडे पाठवला. अखेर त्याला मंजुरी मिळाल्यानंतर या स्टेशनचं नाव प्रभादेवी असं करण्यात आलं.


प्रभादेवी फलकाचं अनावरण

शिवसेनेकडून या सोहळ्याच्या निमित्ताने शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास ‘प्रभादेवी’ फलकाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी खासदार राहुल शेवाळे देखील सहभागी झाले होते. मात्र नामांतरणाच्या श्रेयावरून शिवसेनेतील मंत्री आणि खासदारांमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.हेही वाचा-

जोगेश्वरी-अंधेरीदरम्यान लोकलकोंडीने वाहतूक विस्कळीत

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्याRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा